शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

कॉलेजनंतर वडिलांना चहाच्या ठेल्यावर मदत,रिकाम्या वेळेत अभ्यास करून सागर बनला ‘सीए’

By राम शिनगारे | Updated: July 12, 2024 18:07 IST

कॉलेज सुटल्यानंतर वडिलांना करायचा मदत; बारावीच्या परीक्षेत अकाउंट्समध्ये घेतले होते १०० गुण

छत्रपती संभाजीनगर : गुलमंडी परिसरातील नगारखाना गल्लीत छोट्याशा चहाच्या ठेल्यावर ग्राहकांना चहा देत फावल्या वेळेत अभ्यास करून सागर संतोष मेघावाले हा तरुण सीए परीक्षा उत्तीर्ण झाला. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे मे २०२४ मध्ये घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला अन् मेघावाले परिवाराला सागराएवढा आनंद झाला.

सागर हा स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. सागरच्या वडिलांचा चहाचा ठेला आहे. पैठणगेट परिसरात राहत असल्यामुळे तेथून हा ठेला जवळच होता. सागर व लहान भाऊ दोघे वेळ मिळेल तशी आई-वडिलांना मदत करीत होते. या ठेल्यावरच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो.

सागर दहावीची परीक्षा आ.कृ. वाघमारे शाळेतून उत्तीर्ण झाला. त्यानंतर स.भु. महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. बारावीच्या परीक्षेत अकाउंटमध्ये १०० पैकी १०० गुण त्याने घेतले. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच त्याने सीए परीक्षेची तयारी सुरू केली. त्याने सीपीटी परीक्षेत १४५ गुण घेतले. आयपीसीसी परीक्षेच्या पहिल्या गटात २३५ आणि दुसऱ्या गटात १५० गुण मिळवले. सीएच्या अंतिम परीक्षेत पहिल्या गटात १५८ आणि दुसऱ्या गटात २०५ गुण मिळवीत परीक्षा उत्तीर्ण झाला. या यशाने आई-वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता.

२० वर्षांच्या मेहनतीचे सार्थक झालेचहाचा ठेला चालवून मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मुलगा सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे २० वर्षांच्या मेहनतीचे सार्थक झाले. आमच्या कुटुंबातील सागर हा पहिलाच सीए आहे. त्याचा मला अभिमान वाटतो.- संतोष मेघावाले, सागरचे वडील

दोन वर्षे नोकरी करणारआर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आता दोन वर्षे नोकरी करणार आहे. त्यानंतर स्वत:चा व्यवसाय उभारणार आहे. सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे एक स्वप्न पूर्ण झाले. लहान भाऊ पोलिस भरतीची तयारी करीत आहे. त्याच्या शिक्षणाकडेही लक्ष देणार आहे.- सागर मेघावाले, सीए परीक्षा उत्तीर्ण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादchartered accountantसीएEducation Sectorशिक्षण क्षेत्र