शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१५० कोटींच्या निविदा ‘रिकॉल’ करण्यास प्रशासनाची चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:36 IST

१५० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या निविदा ‘रिकॉल’करण्याचा गेम प्लॅन मनपाने रचला आहे. मंगळवारी या निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. मात्र, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर मुंबई येथे गेले असल्याने निविदा पुनर्प्रसिद्धीचा मुहूर्त हुकला. आयुक्त आल्यानंतर निविदा प्रकाशित करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : १५० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या निविदा ‘रिकॉल’करण्याचा गेम प्लॅन मनपाने रचला आहे. मंगळवारी या निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. मात्र, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर मुंबई येथे गेले असल्याने निविदा पुनर्प्रसिद्धीचा मुहूर्त हुकला. आयुक्त आल्यानंतर निविदा प्रकाशित करण्यात येणार आहेत.शहरातील ५० रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या निविदा महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केल्या होत्या. ज्या २१ कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या, त्यातील दोनच निविदा पात्र असून, उर्वरित निविदाधारक पात्र नसल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. सर्व निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्याचा निर्णय अधिकाºयांनी मागील आठवड्यात घेतला.‘सोयी’चा कंत्राटदार निविदा प्रक्रियेत येत नसल्याने त्यासाठी हा नवीन डाव रचण्यात आल्याचा आरोप आता कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या निविदा डोळ्यात तेल ओतून भरण्यात आल्या आहेत. या निविदा रद्द होऊच शकत नाही, असा दावा कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. मनपा प्रशासन सर्व निविदा पुन्हा प्रसिद्ध करणार असल्याची कुणकुण एका सोयीच्या कंत्राटदाराला कशी लागली. त्याने दहा-पंधरा दिवसांपूर्वीच निविदा रिकॉल होणार असल्याची भविष्यवाणी कशी काय केली होती, असा सवालही कंत्राटदार उपस्थित करीत आहेत.निविदा प्रक्रिया कशासाठी रद्द केली हे कागदावर महापालिकेने उघडपणे नमूद करावे, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे. प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही काही कंत्राटदारांनी दिला आहे.अजून निधीचा पत्ता नाही१५० कोटींमध्ये महाराष्टÑ शासन मनपाला १०० कोटींचा निधी देणार आहे. महापालिकेला आजपर्यंत हा निधीही प्राप्त झालेला नाही. २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असून, या दिवशी भूमिपूजन करण्याचा विचारही पदाधिकाºयांचा आहे.