शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

By admin | Updated: September 13, 2014 23:04 IST

हिंगोली : जिल्ह्यात तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या निवणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे.

हिंगोली : जिल्ह्यात तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या निवणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे. ९७२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून आचारसंहिता पालन, निवडणूक खर्चावर नियंत्रण आदीसाठी पथके स्थापन केल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिली.कासार म्हणाले, २0 सप्टेंबर रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होईल. २७ सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. २९ सप्टेंबर रोजी छाननी तर १ आॅक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. १५ आॅक्टोबरला मतदान होईल.या निवडणुकीसाठी वसमत विधानसभा मतदारसंघात ३१४, कळमनुरीत-३३६, हिंगोलीत ३२२ मतदान केंद्रांची स्थापना केली. वसमतमध्ये २ लाख ६२ हजार १७८, कळमनुरीत २लाख ८१ हजार ४00 तर हिंगोलीत २ लाख ८४ हजार ९४६ मतदार आहेत. त्यात नवीन नोंदणीचे काही मतदार वाढतील.प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी तीन भरारी पथके, दोन स्थिर पथके, व्हीडीओ चित्रीकरण पथक, चित्रीकरण तपासणी पथक, आदर्श आचारसंहिता पालन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९७२ मतदान केंद्रांसाठी तेवढ्याच इव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार असून राखीवसह ११२५ मशीन उपलब्ध राहतील. विधानसभा लढविणाऱ्या उमेदवारासाठी निवडणूक खर्च मर्यादा २८ लाख रुपये एवढी आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन कासार यांनी केले. तसेच काही गैरप्रकार आढळत असल्यास त्याची रितसर तक्रार आचारसंहिता कक्षाकडे दिल्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. तर स्वीप-२ या कार्यक्रमात मतदार नोंदणीची संधी १७ सप्टेंबरपर्यंत आहे. तहसील कार्यालयातील मदत केंद्रात जावून त्याचा लाभ घेता येईल. तसेच यादीत नाव असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, अ. जिल्हाधिकारी राम गगरानी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी के.ए.तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार विद्याचरण कडवकर, श्रीनिवास मेंडके, श्याम मदनूरकर, नर्सीकर आदींची उपस्थिती होती.