शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:39 IST

खाजगी अनुदानीत शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानीत शाळांमध्ये समायोजन होणार असून, या संदर्भातील आदेश ४ आॅक्टोबर रोजी राज्याच्या शिक्षण विभागाने काढले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खाजगी अनुदानीत शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानीत शाळांमध्ये समायोजन होणार असून, या संदर्भातील आदेश ४ आॅक्टोबर रोजी राज्याच्या शिक्षण विभागाने काढले आहेत़राज्यातील शिक्षण विभागाच्या वतीने २०१२ करण्यात आलेल्या पट पडताळणीत अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले होते़ यामध्ये खाजगी अनुदानीत व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांचा समावेश होता़ या अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर ठोस निर्णय होत नव्हता़ याबाबत ४ आॅक्टोबर रोजी राज्य शासनाने आदेश काढला आहे़ त्यामध्ये खाजगी अनुदानीत शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांमधील शाळांमध्ये तर याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे खाजगी अनुदानीत शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे़ जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणालीच्या अनुषंगाने राज्यात शिक्षक, विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण पुरेसे आहे़ तथापि संच मान्यता/पटपडताळणीमुळे विद्यार्थी संख्या कमी होणे किंवा वर्ग/तुकड्या बंद पडणे, शाळेची मान्यता काढून घेणे या कारणास्तव अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना समायोजित करून घेतले जाणार आहे़ त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे़