औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा मंगळवारी कामावर रुजू झाले. ९ दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सुरेश बेदमुथा हे १६ आॅगस्ट रोजी कामावर रुजू झाले. रुजू झाल्यानंतर त्यांची अधिकारी, पदाधिकारी, सदस्य, कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. सायंकाळी ५ वाजेनंतर त्यांच्या दालनात भेट घेण्यासाठी जि.प. मधील अनेक विभागातील कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. जि.प. उपाध्यक्षांच्या दालनात ८ आॅगस्ट रोजी बेदमुथा यांना सदस्य संभाजी डोणगावकर यांनी मारहाण व शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यामुळे ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ९ दिवस खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बेदमुथा मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ ११ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्व जि.प.मध्ये राजपत्रित अधिकारी महासंघाने बंद पुकारला होता. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले होते. जि.प.अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेमुळे संतापाची लाट पसरली होती. विभागीय, पोलीस आयुक्तांकडे याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली होती.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा रु जू
By admin | Updated: August 17, 2016 00:56 IST