शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

९८८ कोरोनाबाधितांची भर, २९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातून शुक्रवारी ९८८ कोरोनाबाधितांची वाढ झाली. शहरात ३५२, तर ग्रामीणमध्ये ६३६ रुग्णांची शुक्रवारी भर पडली. जिल्ह्यातील ...

औरंगाबाद : जिल्ह्यातून शुक्रवारी ९८८ कोरोनाबाधितांची वाढ झाली. शहरात ३५२, तर ग्रामीणमध्ये ६३६ रुग्णांची शुक्रवारी भर पडली. जिल्ह्यातील २६, तर इतर जिल्ह्यातील ३ बाधितांचा उपचारादरम्यान शहरात मृत्यू झाला. १२६६ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने ते घरी परतले.

शहरातील ४९५, तर ग्रामीणमधील ७७१ अशा १२६६ जणांना सुटी देण्यात आली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ९ हजार १० झाली. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३० हजार ८३६ कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी १ लाख १९ हजार ११७ रुग्णांचे उपचार पूृर्ण झाल्याने ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर आजपर्यंत २७०९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

--

मनपा हद्दीतील ३५२ रुग्ण

--

घाटी परिसर २, औरंगाबाद परिसर ३, रेल्वे स्टेशन कॅम्प १, चिकलठाणा ५, परिजातनगर १, म्हाडा कॉलनी ४, मुकंदवाडी ६, जय भवानीनगर २, गारखेडा ५, बंजारा कॉलनी १, गजानननगर २, शिवाजीनगर १, जय भारत कॉलनी १, अशोकनगर १, बौध्दनगर १, एमआयटी हॉस्पिटल १, विश्व भारती कॉलनी १, विष्णुनगर २, देवळाई परिसर २, हनुमाननगर २, बीड बायपास रोड ६, उल्कानगरी २, गुरुदत्तनगर २, गजानननगर १, शाहनूरवाडी १, सहयोगनगर १, स्वराजनगर १, लक्ष्मीनगर १, नाथग्रम कॉलनी १, विशालनगर १, अलोकनगर १, पुंडलिकनगर ३, भारतनगर १, पानदरीबा रोड १, जयसिंगपुरा १, नारळीबाग २, मयुर पार्क १, नंदनवन कॉलनी १, हर्सूल १, हनुमाननगर ३, पॉवर हाऊस १, मयुर पार्क १, नाथनगर १, लक्ष्मी कॉलनी २, शीतलनगर १, जाधवमंडी १, सातारा परिसर ४, शिवनगर २, सहकारनगर २, दर्गा रोड १, सुराणानगर २, कासलीवाल मार्व्हल २, आनंदनगर ३, भीमनगर भावसिंगपुरा १, पेठेनगर २, एम्स हॉस्पिटल १, राज हाईट्स १, त्रिमूर्ती चौक १, जिजामातानगर १, उस्मानपुरा १, एन-१२ येथे १, एन-२ येथे ३, एन ५ येथे १, एन-६ येथे ४, एन-११ येथे २, एन-९ येथे १, एन-८ येथे ४, एन-७ येथे ३, एन ३ येथे २, अन्य २२४.

ग्रामीण भागात ६३६ रुग्ण

तालुकानिहाय औरंगाबाद ९२, फुलंब्री १३, गंगापूर ९०, कन्नड ११०, खुलताबाद ३१, सिल्लोड ७२, वैजापूर ११५, पैठण १०७, सोयगाव ७ असे ६३६ बाधित रुग्ण आढळून आले, तर अनुक्रमे १२८८, १८६, १०७४, ७८६, १९६, ५७६, १३६२, ९४७, ६४७, १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

---

२९ बाधितांचा मृत्यू

--

घाटीत जिल्ह्यातील १५, तर जालना येथील एक आणि नगर जिल्ह्यातील दोघांचा उपचारादम्यान मृत्यू झाला. यात ५२ वर्षीय पुरुष- छावणी, ७५ वर्षीय पुरुष गंगापूर, ६५ वर्षीय महिला सिडको महानगर वाळूज, ५० वर्षीय महिला वैजापूर, ६५ वर्षीय पुरुष वैजापूर, ६६ वर्षीय पुरुष हडको, ५१ वर्षीय पुरुष लिंबगाव, ८० वर्षीय पुरुष जय भवानीनगर, ६० वर्षीय महिला पैठण, ७० वर्षीय महिला जाधववाडी, ६० वर्षीय पुरुष सिल्लोड, ७५ वर्षीय महिला पाचोड, ५७ वर्षीय महिला गंगापूर, ६५ वर्षीय महिला सिल्लोड, ६३ वर्षीय पुरुष सिल्लोड, ४० वर्षीय पुरुष भोकरदन, जालना, ३० वर्षीय पुरुष श्रीरामपूरनगर, ९४ वर्षीय पुरुष नेवासा, अहमदनगर यांचा मृतात समावेश आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात ६५ वर्षीय महिला- शिवनेरी काॅलनी, ३२ वर्षीय पुरुष सारा वैभव जटवाडा, खासगी रुग्णालयात ६४ वर्षीय महिला सावंगी, ६१ वर्षीय पुरुष दिशानगरी बीड बायपास, ५७ वर्षीय पुरुष भडकल गेट, ५८ वर्षीय पुरुष शहानुरवाडी, ६५ वर्षीय महिला सिडको एन १२, ७१ वर्षीय महिला हडको, ६२ वर्षीय महिला जयसिंगनगर, ४४ वर्षीय महिला विष्णूनगर, ६८ वर्षीय पुरुष एन ६ सिडको येथील बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

---