औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ४१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील १२, ग्रामीण भागातील २९ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ३४ जणांना सुटी देण्यात आली. तर उपचार सुरू असताना ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या ३१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २८५ आणि शहरातील २७ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ९४१ एवढी झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार १५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १० आणि ग्रामीण भागातील २४ अशा ३४ रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना कन्नड येथील ६५ वर्षीय पुरुष, बेगमपुरा येथील ६५ वर्षीय महिला, रहीमनगर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
संजयनगर २, उल्कानगरी १, सातारा परिसर ४, अलोकनगर १, अन्य ४
ग्रामीण भागातील रुग्ण
फुलंब्री १, गंगापूर ९, कन्नड ५, खुलताबाद १, सिल्लोड ३, वैजापूर ८, पैठण २