शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:42 IST

पोलिसाच्या दुचाकीला पोलिसांच्या अ‍ॅण्टी डेमो वाहनाने धडक दिली. यात सजन नजन शिसोदे या पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

वाळूज महानगर : पत्नीला भेटुन सासरवाडीहून जालन्याकडे जाणाऱ्या पोलिसाच्या दुचाकीला पोलिसांच्या अ‍ॅण्टी डेमो वाहनाने धडक दिली. यात सजन नजन शिसोदे या पोलिसाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आसेगाव फाट्याजवळ घडली.

सजन नजन शिसोदे (३२ रा. राजावाडी ता.बदनापूर जि.जालना) हा गडचिरोली जिल्ह्यातील अकरापत्ती येथे पोलीस दलात कार्यरत आहे. सजन शिसोदे हे शुक्रवारी दुचाकीने (एम.एच.२१, ए.जे.१३६४) वैजापूर तालुक्यातील जम्मनवाडी येथे सासुरवाडीला गेले होते. तेथून राजावाडी येथे जाण्यासाठी निघाले. औरंगाबादकडे येत असताना आसेगाव फाटा ते खोजेवाडी फाटा दरम्यान ए.एस.क्लबकडून लासूरच्या दिशेने जाणाºया पोलिसांच्या अ‍ॅण्टी डेमो वाहनाने (एम.एच.२०, ए.एस.७३९१) रात्री ८ वाजेच्या सुमारास दुचाकीला धडक दिली.

यात सजन शिसोदे हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर वाहनातील पोलिसांंनी सजन शिसोदे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. या घटनेची एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातWalujवाळूज