औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यातील ८०० कलाकार सहभागी होणाऱ्या इंद्रधनुष्य स्पर्धेला शनिवार, दि. ५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते, तर समारोप अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी दिली. राज्यपाल कार्यालयाच्या वतीने प्रतिवर्षी राज्यातील सर्व विद्यापीठांचा सहभाग असलेल्या इंद्रधनुष्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी स्पर्धेचे यजमानपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळाले आहे. ही स्पर्धा ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान विद्यापीठात पार पडणार आहे. स्पर्धेत राज्यातील कृषी, अभिमतसह २० विद्यापीठे सहभागी होणार असून, २४ कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची जोरदार तयारी विद्यापीठामध्ये करण्यात येत आहे.
इंद्रधनुष्यच्या उद्घाटनाला अभिनेते रजा मुराद येणार
By admin | Updated: November 3, 2016 01:32 IST