शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

जीएसटीनंतर महाग वस्तू विकणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई; केंद्रीय सहआयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 11:50 IST

करातील सूटचा फायदा या कंपन्या हडप करीत आहेत, अशा कंपन्यांवर आता कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय अ‍ॅन्टीप्रॉफिटरिंग अ‍ॅथॉरिटीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय जीएसटी विभागाचे सहआयुक्त अशोककुमार यांनी दिली. 

ठळक मुद्दे तक्रारीत सत्यता आढळून आली की, संबंधित व्यापारी किंवा उत्पादकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल एवढेच नव्हे तर विषयाची गंभीरता लक्षात घेऊन परवानेही रद्द करण्यात येतील. ही कारवाई केंद्रीय व राज्य जीएसटी विभागांतर्गत राष्ट्रीय अ‍ॅन्टीप्रॉफिटरिंग अ‍ॅथॉरिटी करणार आहे. 

औरंगाबाद : जीएसटी दर कमी होऊनही तुम्हाला जीवनावश्यक वस्तू महागड्या किमतीतच मिळत आहेत... कोणी व्यापारी २०० रुपयांच्या वरील किमतीची वस्तू घेतली तरी पक्के बिल देत नाही... बिल दिले तरीही एमआरपीवर जीएसटी आकारली जाते... अशा व अनेक तक्रारी असतील तर आता तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल एवढेच नव्हे तर तक्रारीत सत्यता आढळून आली की, संबंधित व्यापारी किंवा उत्पादकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल एवढेच नव्हे तर विषयाची गंभीरता लक्षात घेऊन परवानेही रद्द करण्यात येतील. ही कारवाई केंद्रीय व राज्य जीएसटी विभागांतर्गत राष्ट्रीय अ‍ॅन्टीप्रॉफिटरिंग अ‍ॅथॉरिटी करणार आहे. 

जीएसटी कौन्सिलने लोकहितार्थ १७८ वस्तूंवरील जीएसटी दर २८ टक्कांवरून १८ टक्क्यांवर आणले आहेत. आता केवळ ५० वस्तंूवरच २८ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. विशेषता: दैनंदिन जीवनात उपयोगी पडणार्‍या अशा वस्तूंवरील कमी झालेल्या जीएसटीदराचा फायदा उत्पादकांनी ग्राहकांना देणे अपेक्षित आहे. मात्र, अजूनही काही कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या किमती कमी केलेल्या नाहीत. करातील सूटचा फायदा या कंपन्या हडप करीत आहेत, अशा कंपन्यांवर आता कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय अ‍ॅन्टीप्रॉफिटरिंग अ‍ॅथॉरिटीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय जीएसटी विभागाचे सहआयुक्त अशोककुमार यांनी दिली. 

अशोक कुमार यांनी सांगितले की, दैनंदिन जीवनावश्यक वस्तंूच्या ज्या उत्पादनावर ० टक्के, ५ टक्के, १२ टक्के व १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. पूर्वी व्हॅट आणि अन्य कर मिळून जास्त कर लावला जात होता; पण जीएसटीमध्ये कर कमी करण्यात आला आहे. मात्र, काही व्यापारी, उत्पादक जीएसटीसंदर्भात अपप्रचार करीत आहेत. जीएसटीमुळे वस्तू महागल्याची चुकीची माहिती ग्राहकांना सांगत आहेत. मुळात जीएसटीमध्ये उत्पादनावरील कमी करण्यात आलेल्या कराचा दर किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा किमती कमी करण्याच्या रूपात ग्राहकांना मिळाला पाहिजे. एवढेच नव्हे तर जीएसटी आकारूनच एमआरपी छापलेली असते. मात्र, काही दुकानांवर एमआरपीवर जीएसटी आकारली जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. जीएसटीच्या नावावर किमती वाढवून नफाखोरी करणार्‍यांवर आता लगाम खेचण्यात येणार आहे.

ग्राहकांनी त्यांच्याकडील तक्रार जीएसटी विभागातील स्टेट स्क्रिनिंग कमिटीकडे द्यावी. तिथे तक्रारीची सोडवणूक झाली नाही तर स्टँडिंग कमिटीकडे तक्रार जाईल. त्या स्तरावर तक्रारीचा निपटारा झाला नाही तर सीबीईसीकडे प्रकरण जाईल. ठरवून दिलेल्या मुदती जर कंपन्यांनी उत्पादनाची किंमत कमी केली नाही किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ दिला नाही तर अखेरीस राष्ट्रीय अ‍ॅन्डीप्रॉफिटरिंग अ‍ॅथॉरिटी त्या उत्पादकावर दंडात्मक कारवाई करेल.

१०५०० करदात्यांनी जीएसटी रिटर्न भरलेच नाही ज्यांची वार्षिक दीड कोटीवरील उलाढाल आहे, अशा मराठवाड्यातील २९ हजार करदात्यांनी केंद्रीय जीएसटीत नोंदणी केली आहे. त्यात ११ हजार जुने तर १८ हजार नवीन करदाते आहेत. जीएसटीत नोंदणी केली;  पण प्रत्यक्षात अजून एकही रिटर्न दाखल न केलेले ११५०० करदाते आहेत. यासंदर्भात केंद्रीय जीएसटी विभागाचे सहआयुक्त अशोककुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत जीएसटी कौन्सिलने करदात्यांना मागील सहा महिन्यांत रिटर्न भरण्यात अनेकदा सूट दिली आहे. रिटर्न भरण्याच्या तारखा वेळोवेळी वाढविण्यात आल्या आहेत. तरीपण ११५०० करदाते रिटर्न भरत नसल्याचे आढळून आले आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबाद