हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा येथील पोलिस पाटील नारायण किशनराव थोरात यांना निलंबित केल्याचा आदेश वसमत उपविभागीय अधिकाऱ्यांना काढला आहे.थोरात यांची गावात चांगली वर्तणूक नसून ते राजकारण करीत असल्याच्या तक्रारी होत्या. तर परस्परांतील वादामुळे थोरात यांच्यावर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पोलिस निरीक्षकांनी तसा अहवालही दिला आहे. त्यावरून बजावलेल्या नोटिसीला समाधानकारक उत्तरही मिळाले नाही. त्यामुळे पुढील आदेशापावेतो निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले.सुराणा यांचा सत्कारहिंगोली येथील पुष्पा सुराणा यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सरस्वती विद्यामंदिर येथे पुष्पाताई हलगे, अनुराधा पातुरकर, आरती मार्डीकर, आशा आलोने, सिंधु चौधरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गढाळाच्या पोलिस पाटलावर निलंबनाची कारवाई
By admin | Updated: August 30, 2014 00:03 IST