तुळजापूर : दोन गटात झालेल्या हाणामारीत चौघे जखमी झाल्याची घटना तालुक्यातील सरडेवाडी येथे रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील एकूण अकरा जणांविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले की, गणेश गोवर्धन सरडे व त्यांच्या आई शेताकडे जात असताना अमोल प्रभाकर नन्नवरे यांनी त्यांना दुचाकीवरून कट मारला. याचा जाब विचारला असता अमोल नन्नवरेसह प्रभाकर संभाजी नन्नवरे, शरद युवराज धुरगुडे, विनोद युवराज धुरगुडे, अंगद युवराज धुरगुडे यांनी सळई व काठीने मारहाण करून जखमी केले अशी फिर्याद गणेश सरडे यांनी दिली. तर शरद धुरगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीत ते दुकानासमोर उभे असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून गोवर्धन दगडू सरडे, गणेश गोवर्धन सरडे, आबा प्रकाशा सरडे, संदीप प्रकाश सरडे,एकनाथ अशोक सरडे व प्रकाश दगडू सरडे यांनी संगनमत करून लोखंडी सळई व काठीने मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे.या परस्पर विरोधी फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील अकराजणांविरूध्द भादंवि कलम ३२६, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरडेवाडी येथे हाणामारी
By admin | Updated: March 22, 2016 01:16 IST