लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शहरातील १,१०१ अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याचा आदेश २१ जुलै रोजी दिला. या आदेशानुसार शुक्रवारपासून महापालिकेने कारवाईला सुरुवात केली. चार वेगवेगळ्या पथकांनी शहरातील १५ धार्मिक स्थळे हटविली. सायंकाळी चिकलठाणा विमानतळाजवळ धार्मिक स्थळ काढण्याच्या कारणावरून मनपाच्या पथकावर दगडफेक करण्यात आली.खंडपीठाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे या दृष्टीने अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. मागील दोन ते तीन दिवसांपासून महापालिका प्रशासन या कारवाईत मग्न होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता एकाच वेळी चार वेगवेगळी पथके कारवाईसाठी बाहेर पडली. प्रत्येक पथकात दहा कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नारेगाव, सिडको-हडको, रेल्वेस्टेशन रोड, हर्सूल, पैठण रोड, चिकलठाणा आदी भागात पथकांनी कारवाई केली. सकाळी (पान २ वर)
धार्मिक स्थळे काढण्याची कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:10 IST