शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाईकवाडेंवर कारवाई कराच!

By admin | Updated: March 15, 2016 00:39 IST

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील रेणू बिबट्याचे तीन बछडे मागील आठवड्यात मरण पावले. या गंभीर घटनेप्रकरणी प्राणिसंग्रहालय

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील रेणू बिबट्याचे तीन बछडे मागील आठवड्यात मरण पावले. या गंभीर घटनेप्रकरणी प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी.एस. नाईकवाडे यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी सूचना सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना केली. आयुक्तांनी नेमलेल्या समितीने अजून प्रशासनाला अहवाल दिलेला नाही. अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.रेणू या बिबट्या मादीने तीन पिलांना जन्म दिल्यावर मनपाच्या प्राणिसंग्रहालयाने वन विभागाला माहिती देणे गरजेचे होते. प्राणिसंग्रहालयाने ही माहिती दडवून ठेवली. नंतर पिलांना दोन दिवस अन्न-पाणी न मिळाल्याने ती मरण पावली. दरम्यान, सोमवारी सकाळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मनपा आयुक्तांसह इतर अधिकारीही उपस्थित होते. बछड्यांच्या मृत्यू प्रकरणात प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. नाईकवाडे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची बाजू कोणालाही पटणारी नव्हती. शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे नाईकवाडे यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना केली. महापालिकेत रिक्त असलेले ३३६ पदे त्वरित भरण्यासाठी प्रशासनाने निर्णय घ्यावा.४मालमत्ता कर लावण्यासाठी खाजगी संस्थेला त्वरित नेमण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करावी.४मराठवाडा मुक्तिसंग्राम येथील पहिला मजला बांधण्यासाठी कामाला त्वरित गती द्यावी.४सलीम अली अथवा कमल तलाव सुशोभीकरणाचा प्रस्ताव नियोजन समितीला त्वरित द्यावा.४रस्त्यांच्या कामांना त्वरित गती देण्यासंदर्भात पाऊल उचलावे.४शासन निधीतून शहरात विविध भागात दहा आरोग्य केंद्रे स्थापन करण्यासाठी जागा निश्चित.४नेहरूनगर येथील रुग्णालयाची डागडुजी करण्यासाठी निविदा काढण्याचे आदेश.