शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बायपासवरील मोठ्या इमारतींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:05 IST

बीड बायपासवर सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी यापूर्वी व्यापक मोहीम राबविली होती. या भागातील २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. सर्व मालमत्ताधारकांना न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बायपासवर कारवाईचा बडगा उगारला. दिवसभरात २३ पैकी १४ मालमत्ता पाडण्यात आल्या. पालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे२३ मालमत्ता शिल्लक : बुधवारी दिवसभरात १४ मालमत्ता भुईसपाट

औरंगाबाद : बीड बायपासवर सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी यापूर्वी व्यापक मोहीम राबविली होती. या भागातील २३ मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. सर्व मालमत्ताधारकांना न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बायपासवर कारवाईचा बडगा उगारला. दिवसभरात २३ पैकी १४ मालमत्ता पाडण्यात आल्या. पालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.बीड बायपास रोडवर महानुभव आश्रम ते बाळापूरपर्यंत सर्व्हिस रोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर विकास आराखड्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड दर्शविण्यात आला आहे. सर्व्हिस रोड तयार करण्याचे दायित्व महापालिकेकडे आहे. मात्र, आजपर्यंत महापालिका चालढकल करीत होती. बायपासवर मागील काही महिन्यात दररोज अपघातात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत होता. त्यामुळे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सर्व्हिस रोड तयार करण्याचा विडा उचलला. या कामात फक्त महापालिकेचे सहकार्य घेण्यात आले. मोठा पोलीस बंदोबस्त लावून पाच मजलीपासून दोन मजलीपर्यंत १०० इमारती पाडण्यात आल्या होत्या. बायपासवरील २३ मालमत्ताधारकांनी खंडपीठ, सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. मंगळवारी सर्व याचिका निकाली निघाल्यानंतर बुधवारी सकाळीच मनपाने कारवाई सुरू केली.बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने एमआयटी महाविद्यालय ते महानुभाव आश्रम, पैठण रोड दरम्यान दिवसभरात १४ अतिक्रमणे भुईसपाट केली. उर्वरित अतिक्रमणांवर गुरुवारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, पी. डी. पाठक, पी. बी. गवळी, एस. एल. कुलकर्णी, सय्यद जमशीद, विनोद पवार, सागर श्रेष्ठ, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.या मालमत्तांवर कारवाईबायपास रोडवरील एमआयटी कॉलेज ते महानुभाव आश्रम पैठण रोड दरम्यान कारवाई करताना सय्यद हबीब, इस्माईल पठाण यांची प्रत्येकी तीन दुकाने, मदिना हॉटेलसमोरील छोट्या टपºया व पत्र्याचे शेड, मंजिल प्राईड समोरील संरक्षण भिंत, एनके ट्रेडिंगजवळील संरक्षण भिंती पाडण्यात आल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEnchroachmentअतिक्रमण