शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परतूर येथे अवैध बांधकामांवर करणार कारवाई

By admin | Updated: October 25, 2015 23:58 IST

परतूर - शहरातील प्रभाग क्रमांक एक ते पाच या भागात नगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेताच बांधकाम करण्यात येत आहे़ या बांधकामासाठी लागणारे संपूर्ण साहित्य रस्त्यावर विखुरलेले आहे़

परतूर - शहरातील प्रभाग क्रमांक एक ते पाच या भागात नगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेताच बांधकाम करण्यात येत आहे़ या बांधकामासाठी लागणारे संपूर्ण साहित्य रस्त्यावर विखुरलेले आहे़ हे अवैध बांधकाम लवकर थांबविण्यात यावे तसेच १ नोव्हेंबरपर्यत बांधकाम परवाना प्रस्ताव सादर करावा अन्यथा या बांधकामधारकांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी दिला आहे़ नगरपरिषदेंतर्गत असलेल्या एक व पाच प्रभागांतून अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. येथील बांधकामधारकांनी परिषदेकडे रितसर परवानगीसाठी कोणतसही प्रस्ताव सादर केलेला नाही़ या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून असल्याचे दिसून येत असून नगर पालिकेकडे या बांधकामासंदर्भात अद्यापही नोंद करण्यात आलेली नाही़ सदरचे बांधकाम हे अवैध असून या बांधकामाच्या मालमत्ताधारकांनी १ नोव्हेंबरपर्यत नगरपरिषदेकडे आवश्यक कागदपत्रे सादर करुन परवानगी मिळवून घ्यावी़ या तारखेच्या आत प्रस्ताव दाखल केले नाही तर त्या बांधकामावर कायदेशीररित्या कार्यवाही करण्यात येईल़, असा इशारा इरलोड यांनी दिला आहे. कायद्यानुसार अवैध बांधकामधारकास तीन वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. दरम्यान, शहरातील बेकायदेशीर बांधकामाच्या तपासणीसाठी सहा कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले असून, हे पथक अवैध बांधकामांवर कारवाई करणार आहे़ ज्यांनी बांधकाम सुरु केलेले आहे़ अशा भागातील बांधकामधारकांनी कामावर परिषदेचा बांधकाम परवाना जवळ ठेवावा़ तसेच तपासणी पथकाने भेट दिल्यानंतर संपूर्ण कागदपत्रे दाखवावीत, असे आवाहनही मुख्याधिकारी इरलोड यांनी केले आहे़ (वार्ताहर)