शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तेरा मटकाबहाद्दर तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:23 IST

शहरात अवैधरीत्या मटका चालवून अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाºया तेरा जणांना पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अंतर्गत जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात अवैधरीत्या मटका चालवून अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाºया तेरा जणांना पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अंतर्गत जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले आहे. संघटित गुन्हेगारी करणाºयांविरुद्ध करण्यात आलेली अशा प्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.पोलिस सूत्रांनी सांगितले, की शहरात मटका किंग म्हणून ओळख असलेला शिवलिंगअप्पा वीर व कमलकिशोर पुसाराम बंग या दोघांनी मटका चालविणाºयांची टोळी एकत्र करून शहरात अवैध मटका अड्डे सुरू केले होते. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण जुगार व मटका खेळताना पैसे हरल्याने गुन्हेगारीकडे वळत असल्याचे जालना पोलिसांच्या निदर्शनास आले. सामाजिक जबाबदारी म्हणून पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी मटका बहाद्दरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना दिले होते. गौर यांनी जिल्ह्यातील मुंबई जुगार कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांचा अभिलेख संकलित केला. त्याचे विश्लेषण जुगार चालविणाºयांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ६५ अंतर्गत प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांचा स्वयंस्पष्ट अहवाल मागितला होता. बारी यांनी गौर यांच्या अहवालास अनुरुप अहवाल सादर केला. प्राप्त अहवालाच्या आधारे पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये वरील प्रतिवाद्यांना दोन वर्षांकरिता जालना जिल्ह्यातून हद्दपार का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली. तसेच त्यांच्या कायदेशीर सल्लागारामार्फत बाजू मांडण्याची संधी दिली होती. त्या वेळी पुन्हा असे गुन्हे करणार नाही, असे हमीपत्र संबंधितांनी सादर केले. मात्र, तरीही या प्रकरणाची चौकशी सुरू असताना शहरात मटका अड्डा चालविल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्यांना जिल्ह्यातून एक वर्ष हद्दपारीची कारवाई केली.सांगलीनंतर जालना जिल्ह्यात झालेली ही पहिलीच कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. १३ पैकी दहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेने हद्दीपारीची नोटीस बजावून त्यांना मुंबई, बीड, सेलू, औरंगाबाद, देऊळगावराजा, देऊळगावमही, सिंदखेडराजा येथे नेऊन सोडले आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक चैनसिंग घुसिंगे, हरीष राठोड, फुलसिंग घुसिंगे, भालचंद्र गिरी यांनी पुढाकार घेतला.