औरंगाबाद : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, औरंगाबादमधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी यामध्ये घवघवीत यश मिळविले आहे. टेंडर केअर होम स्कूलच्या गार्गी बारके हिने ९८.४ टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले आहे. तर नाथ व्हॅली स्कूलच्या मिहिर देशमुख आणि नंदिनी झुनझुनवाला यांनी ९८.२ टक्के गुण मिळविले आहेत. पीएसबीए इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अथर्वा देशपांडे हिने ९७.६ टकके गुण प्राप्त केले आहेत. स्टेपिंग स्टोन हायस्कूलचा विद्यार्थी इमान काद्री याने ९७.४ टक्के गुण मिळविले असून, याच शाळेच्या मोहंमद समीर शेख, जुबी बाबू आणि यशदा मचे या विद्यार्थ्यांनी ९७.२ टक्के गुण मिळविले आहेत.नाथ व्हॅली स्कूलच्या ११२ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांनी ९५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. ४० विद्यार्थ्यांनी ९० ते ९४.९९ टक्क्यांपर्यंत गुण मिळविले आहेत. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, ६० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. स्टेपिंग स्टोन हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून, २३ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए प्राप्त केला आहे. तर ४१ विद्यार्थ्यांनी ९ सीजीपीए प्राप्त केला आहे. मोहंमद समीर शेख, जुबी बाबू आणि यशदा मचे या तीन विद्यार्थ्यांनी ९७.२ टक्के गुण मिळवून संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळविला आहे. टेंडर केअर होम शाळेच्या २१ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए प्राप्त केला आहे. शाळेच्या ४१ विद्यार्थ्यांनी ९१ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. चाटे स्कूलच्या अकरा विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए मिळविला असून, १३ विद्यार्थ्यांनी ९ पेक्षा अधिक सीजीपीए प्राप्त केला आहे. या स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. रिव्हरडेल हायस्कूलच्या ६ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए मिळविला असून, १८ विद्यार्थ्यांनी ९ सीजीपीए प्राप्त केला आहे. या शाळेचाही निकाल शंभर टक्के लागला आहे. (पान ७ वर)
औरंगाबादच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST