शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

बोगस विमा रॅकेटमध्ये फिर्यादीच निघाला आरोपी

By admin | Updated: February 15, 2017 17:29 IST

न झालेल्या अपघाताचा बनावट विमा दावा दाखल करून विमा कंपनीची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविणाराचा कंपनीचा अधिकारीच या रॅकेटचा सदस्य असल्याचे पोलिस तपासात

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 15  -  न झालेल्या अपघाताचा बनावट विमा दावा दाखल करून विमा कंपनीची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविणाराचा कंपनीचा अधिकारीच या रॅकेटचा सदस्य असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमधील डॉक्टर, दलाल आणि पोलीस हवालदार सध्या कोठडीत असून, यात आणखी दोन पोलिसांचा समावेश आहे. या रॅकेटने १५ दिवसांत बोगस विमा दाव्यातून तब्बल ६० लाख रुपये उचलल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिली.बोगस विम्याची कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटमधील डॉ. महेश मोहरीर ( रा. जवाहर कॉलनी), दलाल शेख लतीफ शेख अब्दुल ( रा. समता नगर), आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल अब्दल रज्झाक अब्दुल रहीम(नेमणूक सिटीचौक पोलीस ठाणे) हे १५फेब्रुवारीपर्यंत हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, एचडीएफसी इआरजीओ, एसबीआय जनलर विमा कंपनी आणि फ्यूचर जनरली विमा कंपनीकडे बोगस विमा दावे दाखल  करून या रॅकेट्सने फसवणूक केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी एचडीएफसी इआरजीओचा अधिकारी सतीश अवचार याच्या फियार्दीवरून वेदातनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल आर.डी. नरवडे (बक्कल नंबर १०३८) आणि छावणी ठाण्यात कार्यरत असलेले पोली हेड कॉन्स्टेबल मुश्ताक शेख(बक्कल नंबर १२४)यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. या दोन्ही पोलिसांनीही बोगस अपघात पंचनामे केलेले होते. पंधरा दिवसात ६०लाख उचललेया रॅकेट्सने बनावट कागदपत्राच्या आधारे पंधरा दिवसात ६० लाखाहून अधिक विमा रक्कम उचलले. विशेष म्हणजे आरोपी शेख लतीफ याने कोर्टातील काही कर्मचाऱ्यांनाही मॅनेज केले होते. विमा कंपनीच्या नावे कोर्टाने काढलेली नोटीस कोर्टातील कर्मचारी रजिस्टर्ड डाकने न पाठविता तो शेख लतीफकडे देत.आणि लतीफ हा ही नोटीस हातोहात अवचारकडे देत. अवचारही या रॅके टमध्ये सहभागी असल्याने तो आरोपींना मदत करीत. बँकेत खात्याचे डिटेल्स मागविले..अपघात विम्याची रक्कम विमा कंपनीकडून धनादेश अथवा आरटीजीएसने देण्यात येते. यामुळे आरोपींनी काही दिवसापूर्वीच बोगस जखमींची बँक खातेही उघडली. ज्या खात्यात ही रक्कम वर्ग झाली त्यांची नावे आणि पत्ते,कागदपत्रांची माहिती बँकांकडून पोलिसांनी मागविली आहे.