शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कपीलधार येथे प्रशासनाकडून सुविधांचा अभाव

By admin | Updated: November 4, 2014 01:38 IST

बीड : यात्रा उत्सव समितीच्या वतीने भाविकांच्या व्यवस्थेची जय्यत तयारी केली आहे़ पंचेवीस शौचालयांची उभारणी समितीने केली आहे़

बीड : यात्रा उत्सव समितीच्या वतीने भाविकांच्या व्यवस्थेची जय्यत तयारी केली आहे़ पंचेवीस शौचालयांची उभारणी समितीने केली आहे़ मात्र येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पंचेवीस शौचालये अपुरी पडतील़ जिल्ह्यात अगोदरच डेंग्युची साथ सुरू आहे़ अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाने कपीलधार येथील यात्रा महोत्सवाच्या परिसरात फिरते शौचालये उभारणे अपेक्षीत होते. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र सोमवारी कपीलधार येथे पहावयास मिळाले़बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे मन्मथ स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी देश भरातून लाखो भाविक येतात़ यावर्षी विविध राज्यांमधून पंचेचाळीस दिंड्यासह आठ लाख भाविक श्रीक्षेत्र कपिलधार येथे येणर आहेत़ आलेल्या भाविकांच्या स्रानाची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे़ स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून कपिलधार संस्थानच्या वतीने पंचेवीस शौचालयांची उभारणी केलेली आहे़ परंतु प्रशासनाने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता कपिलधार येथे यात्रेदरम्यान फिरते शौचालये उभारणे आवश्यक होते़ याकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले़मोफत आरोग्य सेवाश्रीक्षेत्र कपीलधार येथील रहिवाशी डॉ. प्रशांत स्वामी यांच्यावतीने मागील तीन वर्षांपासून यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा दिली जाते. याशिवाय जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देखील कपीलधार येथे आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.येथून येणार दिंड्यातीन राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात दिंड्यांचे आगमन कपीलधार येथे मंगळवार नंतर होणार आहे. यामध्ये नागापूर, अंबाजोगाई, करडगाव, शिखर शिंगणापूर, बार्शी, माळेगाव, राशीन मठ वसमत, पूर्णा, कळमनुरी, परळी, बीड, गडगा, कासार शिरसी, वाणीजवळा, चापोली, चामरगा, वाई, तमलूर, मदनूर, हादगाव, बिचकुंदा, पुणे, माजलगाव आदी ठिकाणाहून दिंड्यांचे आगमन कपीलधार येथे होणार आहे. अहमदपूर येथून येणारी दिंडी सर्वात मोठी असणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.दिंडी रस्ता बनला खडतरधुळे-सोलापूर हायवेवरुन मांजरसुंबा घाटापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या श्रीक्षेत्र कपीलधारकडे जाणारा रस्ता कच्चा आहे. मन्मथस्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान लाखो भाविक दिंड्यांमध्ये येत आहेत. मात्र येथील रस्त्याचे काम न झाल्यामुळे भाविकांना खडतर रस्त्यावरुनच चालावे लागणार आहे. यात्रेनिमित्त तरी हा रस्ता दुरुस्त होणे आवश्यक होता, अशा प्रतिक्रिया येथे आलेल्या भाविकांनी व्यक्त केल्या.मंदिराला तेल चढविण्याचे काम युद्धपातळीवरमन्मथस्वामींच्या समाधी स्थळावरील मंदिर पुरातन आहे. यामुळे या मंदिराला रंगरंगोटी न करता संस्थानच्या वतीने तेल चढविले जाते. सोमवारी सेवेकरी मंदिराला तेल चढविण्यात मग्न होते. (प्रतिनिधी)