शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

एका फोन कॉलमुळे लागला फरार आरोपी पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 19:28 IST

हातकडी टोचत असल्याची तक्रार करून पोलिसाच्या हाताला झटका देत आरोपीने केले होते पलायन

ठळक मुद्देप्रवास्याच्या मोबाईलवरून आईला केला होता कॉलफरार आरोपीच्या मनमाड रेल्वेस्टेशन येथे आवळल्या मुसक्या

औरंगाबाद : मुकुंदवाडी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला आरोपी अमर गायकवाड ऊर्फ अमऱ्याने एक कॉल त्याच्या आईच्या मोबाइलवर केला आणि तो मनमाड रेल्वेस्थानकात असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची मदत घेऊन अवघ्या काही मिनिटांत त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

आरोपी अमर गायकवाडला आणण्यासाठी मुकुंदवाडी पोलिसांचे पथक मनमाडला रवाना झाले आहे. वृद्धाला मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे हिसकावल्याच्या आरोपाखाली मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी अमर भाऊसाहेब गायकवाडला ९ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली होती. पोलीस हवालदार दादा काटकर आणि कर्मचारी बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर करण्याची तयारी करत होते. मुकुंदवाडी ठाण्यात नोंद करून त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसविले. हातकडी टोचत असल्याची तक्रार त्याने केल्याने पोलीस कर्मचारी त्याच्या एका हातातील हातकडी काढून दुसऱ्या हातात घालत होते. याचवेळी पोलीस हवालदार काटकर यांच्या हाताला झटका देऊन अमर गाडीतून उडी मारून पळून गेला. 

रात्रभर शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्याजवळ मोबाइल नव्हता. पोलिसांनी त्याच्या आईच्या मोबाइलवर येणाऱ्या कॉलवर नजर ठेवली. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्याने मनमाड रेल्वेस्थानक येथे एका प्रवाशाच्या फोनवरून आईच्या मोबाइलवर कॉल केला. हा कॉल येताच त्याचे लोकेशन पोलिसांना मिळाले आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी मनमाड येथील जीआरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या मोबाइल व्हॉटस्‌ॲपवर आरोपी अमऱ्याचे फोटो पाठवून त्याला पकडून ठेवण्यास सांगितले. अवघ्या काही मिनिटांत जीआरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी मनमाड स्थानकातील एका प्लॅटफॉर्मवर बसलेल्या अमर ऊर्फ अमऱ्याला पकडले. त्याला ताब्यात घेण्यासाठी मुकुंदवाडी ठाण्यातील पथक रवाना झाल्याचे सूत्राने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटक