शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अबब ! एलकेजीचे ‘बजेट’ २५ हजार...

By admin | Updated: June 22, 2015 00:21 IST

संजय तिपाले , बीड हायप्रोफाईल शिक्षणाच्या नावाखाली पालकांचे खिसे कसे रिकामे होत आहेत, हे पहायचे असेल तर बीडमधील इंग्रजी शाळांकडे पहा! डोनेशन, वह्या - पुस्तके, पोशाख, स्कूलबस,

संजय तिपाले , बीडहायप्रोफाईल शिक्षणाच्या नावाखाली पालकांचे खिसे कसे रिकामे होत आहेत, हे पहायचे असेल तर बीडमधील इंग्रजी शाळांकडे पहा! डोनेशन, वह्या - पुस्तके, पोशाख, स्कूलबस, शाळेतील विविध उपक्रम या साऱ्यांचा हिशेब चक्रावून सोडणारा आहे. एलकेजी (पूर्व प्राथमिक शिक्षण) च्या एका विद्यार्थ्याचे एका वर्षाचे बजेट तब्बल २५ हजाराच्या घरात आहे. त्यामुळे इंग्रजी शिक्षण देणाऱ्या संस्थांचे इमले आभाळाकडे झेपावत असताना पालकांची मात्र, सर्रास लूट होत आहे.जिल्ह्यात इंग्रजी शाळांची संख्या १३० इतकी आहे. हा आहे प्रशासनाकडे नोंद असलेला आकडा. प्रत्यक्षात पाचशेहून अधिक इंग्रजी शाळा आहेत;पण त्याची प्रशासनदरबारी नोंदही नाही. विनाअनुदानीत संस्थांनी खेडोपाड्यात इंग्रजी शिक्षण पोहोचवले;परंतु बहुतांश पालकांचा कल शहरातील नामांकित शाळांकडे आहे. मागील काही वर्षांत कुवत नसतानाही केवळ आकर्षण म्हणून इंग्रजी शिक्षणाकडे अनेक पालक मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. पालकांचे इंग्रजी शिक्षणाचे प्रेम पाहून संस्था भलत्याच ‘भाव’ खाऊ लागल्या आहेत. शाळांच्या डझनभर अटी व शर्थींची पूर्तता करताना पालकांची अक्षरश: दमछाक होत आहे. अडवणूक थांबवाइंग्रजी शाळांमध्ये गणवेश, वह्यापुस्तके शाळेतूनच घेतली पाहिजेत असा अट्टाहास केला जातो. यातून पालकांना दुसरा पर्याय राहत नाही. शाळांचा करार झालेल्या विक्रेत्यांमार्फत पुस्तके, पोशाख माथी मारले जातात. त्यामुळे पालकांना निमुटपणे पैसे मोजावे लागतात. ही अडवणूक असून, त्याला रोख लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेशाचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.तपासण्यांकडे दुर्लक्षइंग्रजी शाळांवर प्रशासनाचा वचक नाही, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे राहुल वाईकर यांनी केला आहे. अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल करणाऱ्या संस्थांची विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे. दुर्बल व वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे;पंरतु काही विशिष्ट शाळांमध्येच प्रवेशासाठी आग्रह असतो. कायम विनाअनुदानीत इंग्रजी संस्थांचे डोनेशन व शुल्क पालक व शाळांची संयुक्त समिती ठरवते. याउपरही काही गैर होत असेल तर तक्रारी कराव्यात.-सुखदेव सानप (शिक्षणाधिकारी प्रा.)