शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

अबब...! दोन आठवड्यांत विधी अभ्यासक्रमाच्या दोन हजार पदव्यांचे वितरण; जाणून घ्या कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 17:17 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university : दीक्षांत समारंभाच्या अगोदरपासून पदवी व पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाकडे हजारो अर्ज प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय नोटरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० जूनपर्यंत आहे.

औरंगाबाद : अबब...! दोन आठवड्यात तब्बल दोन हजार विधी अभ्यासक्रमाच्या पदव्यांचे वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी एकाच अभ्यासक्रमाच्या पदव्या घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची झालेली गर्दी पहिल्यांदाच अनुभवली आहे. विशेष म्हणजे, गर्दी करणारे हे विद्यार्थी बहुतांशी विविध न्यायालयांमध्ये व्यवसाय करणारे वकील आहेत.  ( Distribution of two thousand degrees of the Law course in two weeks ) 

केंद्रीय नोटरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० जूनपर्यंत आहे. त्यामुळे विधी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सध्या विविध न्यायालयांमध्ये वकिलीचा व्यवसाय करत असलेल्या विद्यार्थ्यांची पदवी घेण्यासाठी अलीकडे दोन आठवड्यापासून विद्यापीठात गर्दी वाढली आहे. केंद्रीय नोटरीसाठी पात्र ठरलेले वकील देशात कुठेही हा व्यवसाय करू शकतात, तर राज्य नोटरीसाठी पात्र ठरलेल्या वकिलांना राज्यातील ठरवून दिलेल्या तालुका किंवा जिल्ह्यातच व्यवसाय करता येतो. त्यामुळे केंद्रीय नोटरीसाठी बहुतांशी वकिलांचा कल वाढलेला यावरून स्पष्ट होते.

दीक्षांत समारंभाच्या अगोदरपासून पदवी व पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाकडे हजारो अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्या परीक्षा विभागातील कर्मचारी या अभ्यासक्रमाच्या पदव्या वितरणामध्येच व्यस्त आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद