शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मापात फेरफार करणार्‍यांना अभय

By admin | Updated: May 25, 2014 01:30 IST

औरंगाबाद : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे विभागीय कार्यालय उपनियंत्रक वैधमानपशास्त्र, सहायक नियंत्रक व निरीक्षक वैधमानपशास्त्र कार्यालय सहजपणे नागरिकांना सापडत नाही.

 औरंगाबाद : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे विभागीय कार्यालय उपनियंत्रक वैधमानपशास्त्र, सहायक नियंत्रक व निरीक्षक वैधमानपशास्त्र कार्यालय सहजपणे नागरिकांना सापडत नाही. पर्यायाने या कार्यालयांपर्यंत तक्रारी पोहोचत नाहीत व भ्रष्टाचार करणार्‍यांना आपोआप अभय मिळत आहे. जिल्ह्यातील किराणा दुकान, लहान हॉटेल, भाजी विके्रते, कापूस, ज्वारी, बाजरी, गहू व्यापार्‍यांच्या मापांची तपासणी हा विभाग करीत आहे. जिल्हा व शहरात अनेक दुकानदार विक्रेते प्रमाणित मापे वापरत नाहीत. एक किलो, अर्धा किलो, २५०, १००, ५० व २० ग्रॅमच्या वजनांची वैधमापनशास्त्र विभागाकडून मंजुरी घेत नाहीत. लिटरच्या मापाला खालून ठोकलेले असण्याची शक्यता असते. या विक्रेत्यांच्या तक्रारी करण्यासाठी ग्राहकांना ही दोन्ही कार्यालये सहजपणे सापडत नाहीत. २०१३-१४ या वर्षात सहायक नियंत्रक कार्यालयाकडे ग्राहकांच्या फक्त आठ तक्रारी आल्या आहेत. ग्राहकांनो जागरूक व्हा, असे सरकार वारंवार सांगत असले तरी फसवणूक झालेल्यांना तक्रार करण्यासाठी संबंधित कार्यालय सापडत नाही. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, विक्रेत्याकडून वजनानुसार वस्तू मिळाव्यात, व्यापार्‍यांकडून मापात फेरफार होऊ नये म्हणून शासनाने १९५८ मध्ये वजनमापे विभाग स्थापन केला. जिल्ह्याच्या ठिकाणी विभागाचे स्वत:चे व काही ठिकाणी ते भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. औरंगाबादेत वजनमापे विभागाची तीन कार्यालये आहेत. मात्र, तिन्ही कार्यालये अडगळीला असल्याने ग्राहक त्यांच्यापर्यंत तक्रार करण्यास पोहोचतच नाहीत. विभागीय कार्यालय उपनियंत्रक वैधमानपशास्त्र, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ रोड, ज्युबिली पार्क येथे आहे. कार्यालय बंगल्यात असल्यामुळे येथे आहे का नाही, असा प्रश्न आहे. सहायक नियंत्रक कार्यालय मध्यवर्ती सुविधा इमारत, सिडको एन-७ येथे आहे. या कार्यालयाचा फलक झाडांच्या आड असल्यामुळे जवळ जाऊनही कार्यालय सापडत नाही. विशेष म्हणजे ही इमारत विभागाच्या मालकीची आहे. निरीक्षक, वैधमापनशास्त्र विभाग १, २, ३, जबिंदा कॉर्नर, देवानगरी, दर्गारोड, शहानूरवाडी येथे आहे. येथे जाण्यासाठी ग्राहकांना दोन ते तीन वेळा रिक्षा बदलावी लागते. कार्यालय भूमिगत असल्यामुळे दिसत नाही. दुकानदारांकडून मापात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक अनेक ठिकाणी केली जात आहे. तक्रार करण्यासाठी वजनमापे विभागाची कार्यालये सापडत नाहीत. त्यामुळे तक्रारदारांची अडचण होत आहे. विभागाने मोक्याच्या ठिकाणी कार्यालय घ्यावे. -संपत रोडगेवजनमापे विभाग सापडत नसल्यामुळे तक्रारदार तेथे जाऊ शकत नाहीत. यामुळे ग्राहकांचे संरक्षण होत नाही. त्यामुळे या विभागाचा उपयोग काय? असा प्रश्न नागरिक विचार आहेत. शासनाला वैधमापनशास्त्र विभागामार्फत वर्षाला लाखो रुपये महसूल मिळतो तरी कार्यालये अडगळीच्या जागी का? ग्राहकांची विळवणूक व फसवणूक कधी थांबणार?२०१३ -१४ वर्षात कार्यालयाकडे ग्राहकांनी केलेल्या आठ तक्रारींसंदर्भात चौकशी केली असता पाच दुकानदार दोषी आढळले. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. तीन तक्रारी खोट्या आढळल्या. -र.धों. दराडे, सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र