शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करणे बंधनकारक

By विकास राऊत | Updated: July 18, 2024 19:49 IST

बाळ जन्मत:च आधार नोंदणी केली का? 

छत्रपती संभाजीनगर : बाळ जन्माला येताच आधार क्रमांक नोंदणीचा आदेश सरकारने दिलेला आहे. गेल्या सहा महिन्यांत ८ हजार ६१ पैकी १ हजार ५६० बालकांची आधार नोंदणी झाली आहे. पुरावे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बारा अंकी क्रमांकाचे कार्ड दिले जाते. त्याला आधार कार्ड म्हणतात. आधार कार्ड आता लहान मुलांसाठी बंधनकारक आहे. नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करावी लागणार आहे. वयानुसार बायोमेट्रिक बदल होत असल्यामुळे नवजात बालकाचं आधार कार्ड तयार केले जात नव्हते. आता नवजात बालकाला जन्मासोबतच आधार नोंदणीही मिळेल. मुलांचे वय पाच वर्षे पूर्ण होईल, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स घेतले जातील.

जन्मत:च आधार क्रमांक नोंदणीलहान मुलांसाठीही आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा कोणत्याही सरकारी योजनेत नोंदणीसाठी ते आवश्यक आहे. युआयडीएआयने पाच वर्षांखालील मुलांसाठी बायोमेट्रिक तपशिलांची आवश्यकता केली आहे.

सहा महिन्यांतील आकडे काय सांगतात?८ हजार ६१ जन्म : शहरातील घाटी रुग्णालयात सहा महिन्यात सरासरी सुमारे ८ हजार ६१ बालकांचा जन्म झाला.१,५६० आधार नोंदणी : सहा महिन्यात केवळ १ हजार ५६० नवजात शिशूंची आधार नोंदणी झाल्याचे प्रमाण आहे. 

सरासरी रोज २० नोंदणी होत असल्याचे प्रमाण आहे. जिल्हा पातळीवर याचे आकडे वेगळे असतील.- गिरीश जाधव, आधार केंद्र व्यवस्थापक

कोणत्या महिन्यात किती?महिना....... सरासरी जन्मदर.............            आधार नोंदणीजानेवारी.....१,३४० ......................२६०फेब्रुवारी.....१,२५८ .....................२४०मार्च .....१,४४५ .........................२८०एप्रिल.....१,३९७ ......................२६०मे.....१,४१३ ..........................२८०जून....१,२०८ .......................२४०

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल