शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इस्कॉन केंद्रात श्रीरामलीला महोत्सव, अयोध्यातून आलेल्या ३० कलाकारांची टीम करणार सादर

By साहेबराव हिवराळे | Updated: October 13, 2023 17:04 IST

दररोज सायंकाळी ६ वाजेला आरतीने महोत्सवाची सुरुवात होईल. सर्वांसाठी नि: शुल्क प्रवेश आहे.

छत्रपती संभाजीनगर : इस्कॉन- वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक केंद्र (इस्कॉन- व्हीईसीसी) वरुड फाटा येथे श्री रामलीला महोत्सव समितीतर्फे श्रीरामलीला महोत्सव रविवार दि.१५ ते मंगळवार २४ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे.

यासाठी अयोध्येतून ३० कलाकारांची टीम शहरात दाखल होत आहे. “भारत की सर्वश्रेष्ठ रामलीला” पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून रामलीलांचे प्रत्यक्ष प्रस्तुतीकरण यावेळी डिजिटल स्वरूपात आहे. दररोज सायंकाळी ६ वाजेला आरतीने महोत्सवाची सुरुवात होईल. सर्वांसाठी नि: शुल्क प्रवेश आहे. दररोज रामलीला प्रस्तुतीनंतर सर्वांना महाप्रसाद वितरित केल्या जाणार आहे. दररोज किमान ३००० रामभक्तांची उपस्थिती असेल, असा अंदाज आहे. विजयादशमीच्या दिवशी वीस हजार भाविक उपस्थित राहतील. यावेळी दसरामेळा, रावण दहन व रामराज्याभिषेकाने महोत्सवाची सांगता होईल.

भव्य रंगमंचावर होणार सादरीकरणमहोत्सवासाठी इस्कॉन व्हीईसीसीच्या प्रांगणात वीस हजार स्क्वे. फुटचा भव्य पेंडाॅल उभारण्यात येणार आहे. ४० बाय ३० स्क्वे. फुटच्या भव्य रंगमंचाची निर्मिती केली जात आहे. एलईडी स्क्रीनवर रामलीलेनुसार प्रसंगोचित बॅक ग्राउंड बदलण्याची सोय असेल.

विद्यार्थ्यांसाठी भारताच्या इतिहासावर परीक्षेचे आयोजनया महोत्सवानिमित्ताने ८ ते १३ वर्षे व १४ ते १८ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री रामायण व आत्मनिर्भर भारताच्या इतिहासावर आधारित नि:शुल्क स्वर्णिम भारत प्रश्नोत्तरी स्पर्धेचे आयोजन श्रीरामलीला महोत्सव समिती, छत्रपती संभाजीनगर व विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानद्वारे केले आहे. प्रथमस्तराची परीक्षा शाळा, क्लासेस, सोसायटी मध्ये होणार असून द्वितीय स्तराची परीक्षा १५ ते २१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत रामलीला महोत्सव परिसरात होणार आहे. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत परीक्षा देता येणार आहे. २५ बहुपर्यायी प्रश्नांच्या प्रथम स्तराच्या परीक्षेत आतापर्यंत १५००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून आणखी किमान १०००० विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. रामलीला महोत्सवास उपस्थित स्पर्धकांना सहभागिता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारोह श्रीरामलीला महोत्सवा दरम्यान होणार आहे.

शहर बसची सेवाशहरवासीयांच्या प्रवासासाठी बाबा पेट्रोलपंप आणि सिडको बसस्थानकातून स्मार्ट सिटी बसेसची सुविधा सायंकाळी ६ वाजेपासून रात्री १०:३० वाजेपर्यंत राहणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद