शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

छत्रपती संभाजीनगरमध्ये ३२ वर्षांपूर्वी टेकऑफ घेताच कोसळले होते विमान, कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या : अपघातात ५५ जणांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:53 IST

Plane Crash In Chhatrapati Sambhajinagar: अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. या भीषण घटनेमुळे ३२ वर्षांपूर्वी म्हणजे २६ एप्रिल १९९३ मध्ये छत्रपती संभाजीनगरात कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. या अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाला होता.

छत्रपती संभाजीनगर - अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. या भीषण घटनेमुळे ३२ वर्षांपूर्वी म्हणजे २६ एप्रिल १९९३ मध्ये छत्रपती संभाजीनगरात कर्तबगारांना हिरावून नेणाऱ्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. या अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाला होता.

इंडियन एअरलाइन्सच्या दिल्ली-जयपूर-उदयपूर-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतले होते. मात्र, उड्डाणासाठी आवश्यक उंची विमानाला गाठता आली नाही. त्यामुळे धावपट्टीला लागूनच असलेल्या बीड महामार्गावरील उभ्या उंच ट्रकला विमानाचे मागील चाक चाटून गेले. विमानाचे उड्डाण पाहण्यासाठी चालकाने तेथे हा ट्रक उभा केला होता. त्यात कापसाच्या गाठी होत्या. ट्रकला चाटून गेल्यानंतर विमानाचे मागील एक चाक निखळून पडले. पुढे चिकलठाणा परिसरातील उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीवर विमान आदळले व भरकटत जाऊन एका शेतात पडले. त्यानंतर त्याचे तुकडे होऊन आग लागली होती.

विमानाच्या मागील भागातील सर्व, तर समोरच्या भागातील काही प्रवासी मृत्युमुखी पडले. यातील काहीजण जळून, तर काही गुदमरून मृत्यू पावले. छत्रपती संभाजीनगरच्या जडणघडणीत  मोलाचा वाटा असलेल्या व्हिडिओकाॅनचे नंदलाल धूत, ए. डी. जोशी, पी. यू. जैन-ठोले, हाॅटेल गुरूचे जव्हारानी, राजेंद्र मोटार्सचे दीपक मुनोत, व्ही. ए. जाधव यांच्यासह ५५ जणांचा दुर्दैवी मृत्यू शहरवासीयांच्या मनाला चटका लावून गेला. 

विमान जुने होते, रनवे छोटा होता...या अपघातात जे काही बोटावर मोजण्या इतके प्रवासी वाचले त्यातील मी एक आहे. तो कडक उन्हाचा दिवस होता. तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सियस होते. हवा विरळ होती. विमान जुने होते, रनवे छोटा होता. मात्र, आज गुजरातमध्ये विमान अपघात झाला तेव्हा विमान टेकऑफ करुन ६२५ फूट उंचीवर पोहोचले होते. सुरुवात चांगली झाली. टेकऑफ नंतरची उंचीही समाधानकारक गाठली होती. पण नंतर इंजिनची ताकद कमी पडली असावी, तांत्रिक किंवा संगणकीय बिघाड झाला असावा. जगात दररोज १० लाख टेकऑफ व लॅंडिंग होतात पण त्यात कधी तरी एखादा अपघात होतो. त्यामुळे विमानाचा प्रवास आजही सुरक्षितच आहे. पण विमान अपघात झाल्यावर कोणीच वाचत नाही, हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.- अनिल भालेराव; देवगिरी प्रांत संघचालक 

विमानाचे तीन तुकडे, उड्या मारून बाहेर पडलेले प्रवासी सुदैवाने सुखरूप३२ वर्षांपूर्वीच्या या दुर्घटनेत ५३ प्रवासी आणि २ कर्मचारी अशा ५५ जणांचा बळी गेला होता. विमानाचे तीन तुकडे झाले होते. या तुकड्यांतून पटापट उड्या मारून बाहेर पडलेले प्रवासी सुदैवाने सुखरूप राहिले. विमान अपघाताचे रंगीत छायाचित्र दुसऱ्या दिवशीच्या अंकात केवळ ‘लोकमत’मध्येच प्रसिद्ध झाले होते. दुर्घटनेनंतरचे हे पहिले छायाचित्र ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी स्वत: कॅमेऱ्यात टिपले हाेते.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद