शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

चिंतेची बाब; उच्च शिक्षणाकडे तरुणाईची पाठ, ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’त महाराष्ट्र आठव्या स्थानी

By प्रसाद आर्वीकर | Updated: February 9, 2024 17:39 IST

एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचे प्रमाण दरवर्षी निश्चित केले जाते. त्यावरून प्रत्येक राज्याचा ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’ (जीईआर) ठरविला जातो.

नांदेड : पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा राज्याचा रेशो ३४.९ इतका कमी असून, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आठव्या स्थानावर फेकला गेला आहे. पदवी प्रवेशाचे घटते प्रमाण या सर्वेक्षणातून समोर येत असून, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे वळावे, यासाठी शिक्षण विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचे प्रमाण दरवर्षी निश्चित केले जाते. त्यावरून प्रत्येक राज्याचा ‘ग्रॉस एनरोलमेंट रेशो’ (जीईआर) ठरविला जातो. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानंतर देशातील सर्व राज्यांचा जीईआर जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य देशात आठव्या क्रमांकावर आहे. चंडीगडमध्ये जीईआर सर्वाधिक ६६.१ एवढा आहे. याचाच अर्थ चंडीगडमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. दिल्ली, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड या राज्यांचा जीईआर अधिक आहे. त्यामुळे राज्यात उच्च शिक्षणाकडे विद्यार्थी पाठ का फिरवतात. बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थी गळती का होते? याचा शोध उच्च शिक्षण विभागाकडून घेतला जात आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनानंतर परिस्थिती बदलली का?२०२० मध्ये देशात कोरोनाचे संकट निर्माण झाले होते. या संकटात अनेक बदल झाले. शिक्षण पूर्ववत झाले. पण, त्यानंतर परिस्थिती बदलली असल्याचे संस्थेच्या अहवालावरून दिसत आहे. राज्यात २०१९-२० मध्ये पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी १३ लाख ६४ हजार ४४८ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ९२ टक्के म्हणजे १२ लाख ५७ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी पदवीचे प्रवेश घेतले. यावर्षी केवळ ८ टक्के जागा रिक्त होत्या. मात्र, २०२०-२१ मध्ये पदवीसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाण ७७.९ टक्के असून, २२ टक्के जागा रिक्त राहिल्या. तर २०२१-२२ मध्ये यात थोडी वाढ झाली. ७९ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि २१ टक्के जागा रिक्त राहिल्या.

राज्यनिहाय जीईआरचंडीगड : ६६.१दिल्ली : ४७.६तामिळनाडू : ४६.९उत्तराखंड : ४५.७सिक्कीम : ३९.९तेलंगणा : ३९.१महाराष्ट्र : ३४.९

टॅग्स :Educationशिक्षणNandedनांदेड