शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचे कर्ज; वर्षाला पाच टक्के व्याज; पिढीजात व्यावसायिकांना पीएम विश्वकर्मा योजना वरदान

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 27, 2023 12:59 IST

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कारागिरांना करावी लागणार प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : देशात असे कोट्यवधी कारागीर आहेत जे आपला खानदानी व्यवसाय तेवढ्याच नेटाने करत आहेत. त्यांच्याकडे पारंपरिक कौशल्य आहे, त्या व्यवसायाला लागणारे साहित्य खरेदीसाठी मुबलक रक्कम नाही. अशा कारागिरांसाठी केंद्र सरकारने ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खानदानी कारागिरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, योजनेसाठी पहिल्या टप्प्यात आपल्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही.

काय आहे पी.एम.विश्वकर्मा योजना?ज्यांचे खानदानी व्यवसाय आहेत. जसे लोहार, सोनार, कुंभार, सुतार, मोची अशा १८ पारंपरिक व्यवसायांचा समावेश पी.एम. विश्वकर्मा योजनात समावेश होतो. यात केवळ कर्जच नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. प्रशिक्षण कालावधीत स्टायपेंडही देण्यात येणार आहे.

व्याजदर कमीकर्ज मंजूर होण्याआधी खानदानी कारागिरांना ७ दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर साहित्य खरेदीसाठी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. ते कर्ज परतफेड केले की, लगेच २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येईल. विशेष म्हणजे वर्षाला ५ टक्के व्याजदर आकारला जाईल.

कोणाला मिळते कर्ज१) १८ पारंपरिक व्यवसायातील खानदानी कारागिर या योजनेचा फायदा घेऊ शकतात.२) लाभार्थीचे वय १८ वर्षापेक्षा जास्त आणि ५० वर्षांपेक्षा कमी असावे.३) मान्यताप्राप्त संस्थेचे संबधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.

कागदपत्रे काय लागतात ?या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँक पासबुक आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

ऑनलाइन अर्ज कसा कराल ?अधिकृत बेवसाइट pmvishwakarma.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.

पिढीजात कारागिरांना सुवर्णसंधीपीएम विश्वकर्मा योजना पिढीजात व्यवसाय करणाऱ्या कारागिरांसाठी व्यवसायवाढीसाठी सुवर्णसंधी आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरसह आणखी ७ जिल्ह्यांचा समावेश नाही. मात्र, पुढील टप्प्यात समावेश होऊ शकतो. तेव्हा जिल्ह्यातील कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येईल.-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय