शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या ८६४ रुपयांच्या बियाणांसाठी १२००रुपयांची मागणी; डमी ग्राहक पाठवून कृषी विभागाची कारवाई

By बापू सोळुंके | Updated: June 8, 2024 20:41 IST

सात दुकाने बंद करण्याचे आदेश, शेतकऱ्यांकडून फोन पे द्वारे १२००रुपये घेताच भरारी पथकाने दुकानदारावर कारवाई केली.

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना लुटण्याची एकही संधी व्यापारी सोडत नसल्याचा अनुभव कृषी विभागाने शनिवारी जिल्ह्यात विविध कृषी सेवा केंद्रावर पाठविलेल्या डमी ग्राहकांना आणि अधिकाऱ्यांना आला. खरीप हंगामासाठी कपाशीच्या बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून ८६४ रुपये किंमतीच्या कपाशी बियाणासाठी शेतकऱ्यांकडून १२००रुपये उकळले जात असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या पाच दुकानदारांवर कृषी विभागाने कारवाई सुरू केली असून या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात येणार आहे.

माजी कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघ असलेल्या सिल्लोड तालुक्यात कपाशी बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही दुकानदार जादा दराने कपाशी बियाणांची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या राज्य भरारी पथकाला मिळाली. अशा दुकानदारांविरोधात धडक कारवाई करण्यासाठी भरारी पथकाने शनिवारी सिल्लोड येथील कांचन ॲग्रो एजन्सी मध्ये डमी ग्राहक पाठवून कपाशीच्या बियाणाची मागणी केली. तेव्हा कपाशीच्या ४७५ ग्रॅम च्या एका पाकिटाची किंमत ८६४रुपये असताना बाराशे रुपयांत हे पाकिट विक्री केले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून फोन पे द्वारे १२००रुपये घेताच भरारी पथकाने दुकानदारावर कारवाई केली.

अशाच प्रकारे सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील माऊली कृषी सेवा केंद्रात राशी कंपनीच्या कपाशीच्या बियाणासाठी कृषी विभागाने पाठविलेल्या शेतकऱ्याकडून अकराशे रुपये घेतले. ही रक्कमही संबंधित दुकानदाराने फोन पे च्या माध्यमातून स्विकारली. याच गावातील बळीराजा ॲग्रो एजन्सी चालकाने अन्य एका कंपनीच्या कपाशीच्या वाणाच्या ८६४ रुपये किमतीच्या बियाणासाठी शेतकऱ्याकडून हजार रुपये उकळले. याच गावातील श्रद्धा कृषी सेवा केंद्रचालकाने तुलशी कंपनीच्या बियाणासाठी शेतकऱ्याकडून बाराशे रुपये घेतल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. येथील साईनाथ कृषि सेवा केंद्र या विक्रेत्याने कबड्डी वाणाचा स्टॉक नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना बियाणे विक्री केले नाही. यानंतर लगेच भरारी पथकाने संबंधित दुकानाची आणि त्याच्या गोडावूनच झडती घेतली असता तेथे बियाणांची पाकिटे आढळून आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख व कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर. ए. पाटील आणि कृषी अधिकारी संजय व्यास यांनी केली.

पैठण ,कन्नड तालुक्यातही कारवाईकृषी विभागाने पैठण तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील पंचावतार कृषी सेवा केंद्रात डमी ग्राहक पाठवून कब्बडी वाणाची मागणी करण्यास सांगितले. तेव्हा दुकानदाराने १२००रुपयांत एक पाकिट विक्री केले. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्राचालकाने कबड्डी हे बियाणांचा स्टॉक असताना दुकानात बियाणे उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. याविषयी संबंधित शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करताच भरारी पथकाने पुन्हा डमी ग्राहक पाठवून खात्री केली . यानंतर दुकान आणि गोडावूनवर छापा टाकला असता तेथे संबंधित बियाणांचे सात पाकिटे आढळून आली. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक आणि विकास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कपाशी बियाणांच्या विशिष्ट वाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करणे आणि शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील सात कृषी सेवा केंद्रचालकांना विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले. मंगळवारी त्यांची सुनावणी घेऊन त्यांच्या दुकानांची परवाने निलंबित केली जाईल. -- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक