शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

९९% सातबारा आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:39 IST

नांदेड: सातबारा आॅनलाईन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून आजघडीला ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मूळ सातबारात असलेली प्रत्येक बाब संगणकीकृत सातबारात समाविष्ट केली जात आहे. त्याचवेळी सन २०१४-१५ पासून ते चालू वर्षापर्यंतच्या पीकपेºयाची नोंद सातबारावर घेतली जात आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक ५० हजार ३५५ सातबारा हे लोहा तालुक्यात संगणकीकृत करण्यात आले आहेत.

अनुराग पोवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सातबारा आॅनलाईन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून आजघडीला ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मूळ सातबारात असलेली प्रत्येक बाब संगणकीकृत सातबारात समाविष्ट केली जात आहे. त्याचवेळी सन २०१४-१५ पासून ते चालू वर्षापर्यंतच्या पीकपेºयाची नोंद सातबारावर घेतली जात आहे.जवळपास चार महिन्यांपासून सातबारा संगणकीकरणाचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे. तलाठ्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले असून सध्या पीक विमा, पीक कर्ज आदी विषयांमुळे हे काम थोडे बाजूला गेले असले तरीही येत्या काही दिवसांतच १०० टक्के सातबारा संगणकीकृत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्त केला आहे.३१ जुलैपर्यंत १०० टक्के सातबारा संगणकीकृत करण्याचे उद्दिष्ट असून ९९ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुखेड, किनवट, माहूर, भोकर, हदगाव, हिमायतनगर, लोहा, बिलोली, धर्माबाद आणि उमरी तालुक्यात सातबारा संगणकीकरणाचे काम ९९ टक्क्यांहून अधिक झाले आहे. तर देगलूर, मुदखेड, कंधार, नायगाव या तालुक्यांतही ९६ ते ९८ टक्क्यापर्यंत काम पूर्ण झाले.आजघडीला सर्वाधिक ५० हजार ३५५ सातबारा हे लोहा तालुक्यात संगणकीकृत करण्यात आले आहेत. त्या खालोखाल कंधार तालुक्यात ४९ हजार १३१, मुखेड- ४८ , हजार ६६२, हदगाव- ४२ हजार १४४, किनवट- ३९ हजार, ३५६, नांदेड- १८ हजार ८५८, अर्धापूर- ११ हजार ७९१, देगलूर- २६ हजार ४९१, माहूर- १६ हजार ९६, भोकर- १९ हजार ७७१, मुदखेड- १३ हजार ४१६, हिमायतनगर- १९ हजार ४७५, बिलोली -३१ हजार ७८२, नायगाव- २९ हजार ५०५, धर्माबाद तालुक्यात १८ हजार ४३५ आणि उमरी तालुक्यात १९ हजार १०१ सातबारा संगणकीकृत झाले आहेत.जिल्ह्यात आजघडीला ४ लाख ५४ हजार १६९ सातबारा मंडळ अधिकाºयांनी प्रमाणित करुन संगणकीकृत केल्या आहेत. उर्वरित ४ हजार ७१२ सातबारा लवकरच संगणकीकृत केले जातील, असेही महसूल विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. महसूल विभागाने हाती घेतलेल्या संगणकीकृत सातबारामध्ये पीकपेºयाची तीन वर्षांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. २०१४-१५, २०१५-१६ व २०१६- १७ च्या खरीप पिकांची माहिती उपलब्ध आहे.