नांदेड : जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी रविवारी झालेल्या मतदानाला मतदारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत ९६़५१ टक्के मतदान केले़ त्यामुळे निवडणुकीच्या निकालाचे वेध सर्वांना लागले आहे़ सोमवारी मतमोजणी होणार आहे़ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी १३ मार्च रोजी शांततेत मतदान झाले़ एकूण १ हजार १४९ पैकी १ हजार १०९ मतदारांनी मतदान केले़ यामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयातील २६३ पैकी २५३, देगलूर येथे ७५ पैकी ७४, कंधार येथे १४६ पैकी १३९, हदगाव येथे ७५ पैकी ७२, बिलोली येथे ८७ पैकी ८४, मुखेड येथे १७१ पैकी १६९, किनवट येथे ७५ पैकी ७०, नांदेड येथे १५८ पैकी १५२ व भोकर येथे १०० पैकी ९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़
पतसंस्थेसाठी ९६ टक्के मतदान
By admin | Updated: March 14, 2016 00:21 IST