शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

आषाढी एकादशीच्या नैवेद्यासाठी ९ हजार लाडू तयार

By admin | Updated: July 11, 2016 01:13 IST

औरंगाबाद : ‘विठ्ठल, विठ्ठल जयहरी विठ्ठल’ असे नामस्मरण करीत रविवारी तीन तासांत महिला भाविकांनी शेंगदाणा व गुळाचे ९ हजार लाडू तयार केले.

औरंगाबाद : ‘विठ्ठल, विठ्ठल जयहरी विठ्ठल’ असे नामस्मरण करीत रविवारी तीन तासांत महिला भाविकांनी शेंगदाणा व गुळाचे ९ हजार लाडू तयार केले. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व लाडू मोठ्या पंढरपुरात वारकऱ्यांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली असताना शहरातील महिला भाविकांना लाडूरुपी महाप्रसाद तयार करण्यातच विठोबाचे दर्शन झाल्याचा परमानंद मिळाला. भक्तीला सेवेची जोड मिळाल्यावर प्राप्त होणाऱ्या आत्मानंदाची अनुभूती सर्वांनी घेतली. डॉ. मंगलनाथ महाराज सेवा संघाच्या वतीने मागील ११ वर्षांपासून आषाढी एकादशीसाठी लाडू तयार करण्याचा सेवाभावी उपक्रम राबविला जात आहे. शेकडो मैलांचा पायी प्रवास करून पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना आपल्या हाताने तयार केलेला फराळ मिळावा यापेक्षा परमानंद कोणता, या भावनेने प्रेरित झालेल्या महिलांनी जवाहर कॉलनी परिसरातील न्यू शांतीनिकेतन कॉलनी येथे सकाळी १० वाजता शेंगदाणा व गुळाचे लाडू तयार करण्यास सुरुवात केली. आपल्या हाताने तयार केलेल्या लाडूचा नैवेद्य पंढरपूरच्या विठोबाला दाखविण्यात येणार व तो प्रसाद नंतर भक्तांना मिळणार याचा आनंद प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर झळकत होता. अवघ्या तीन तासांत ९ हजार लाडू तयार झाले. विठ्ठल भक्तांसाठी लाडू तयार करून आत्मानंद मिळाला, अशी भावना संगीता भागवत यांनी व्यक्त केली. प्रतिमा चव्हाण, ज्योती घुले, दीपा मेहता, ताराबाई घुगे, कमलाबाई ढाकणे, राधा पवार, सुनीता झिरपे यांच्यासह शेकडो महिलांनी लाडू तयार केले.