लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळासाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नऊ संचालक बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तशी घोषणा अद्याप बाकी आहे. उर्वरित ९ जागांसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंंगणात असल्याची माहिती उपनिबंधक कल्पना शहा यांनी दिली.मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिष्ठाचा समजला जाणारा सोसायटी सर्वसाधारण प्रवर्गातून एकून ७ संचालक निवडणून द्यावयाचे आहे. या प्रवर्गातून एकूण ३३ अर्ज दाखल होते. पैकी २३ अर्ज मागे घेतल्याने ७ जागासाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सोसायटी सर्वसाधारण महिला प्रवर्गात दोन जागा आहेत. त्यासाठी आठ अर्ज आले होते.पैकी ५ अर्ज मागे घेतल्याने दोन जागांसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशा नऊ जागांसाठ एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. तर ग्रामपंचायतच्या मतदार संघात चार संचालकांचे २९ अर्ज आले होते.पैकी २५ जणांनी माघार घेतल्याने ४ जणांचेच अर्ज राहिल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे. तर व्यापारी मतदार संघात दोन जागांसाठी १० अर्ज होते त्यापैकी ८ मागे घेतल्याने या मतदार संघातील दोन संचालकांची बिनविरोध निवड निश्चित मानण्यात येते आहे.सोसायटीमध्ये व्हीजेएनटी प्रवर्गातील एका जागेसाठी बिनविरोधची घोषणा बाकी आहे. ओबीसी प्रवर्गाच्या सोसायटी मतदार संघात एक जागेसाठी बिनविरोध निवडीची घोषणा बाकी आहे. तर हमाल मापाडी मतदार संघात एकच अर्ज राहिल्याने या मतदार संघाची अनौपचारिक घोषणा बाकी आहे. एकूण १८ पैकी ९ जागा बिनविरोध आल्या असून, या जागा पालकमंत्री बबनराव लोणीकर, राहूल लोणीकर व शिवसेना जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे यांच्या भाजपा, शिवसेना युतीच्या आहेत.
मंठा कृउबाचे नऊ संचालक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:25 IST