शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

‘डीसीसी’साठी ९८़९५ टक्के मतदान

By admin | Updated: May 8, 2015 00:27 IST

उस्मानाबाद : जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी गुरूवारी मतदान प्रक्रिया झाली़ जिल्ह्यातील ८५७ मतदारांपैकी

उस्मानाबाद : जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी गुरूवारी मतदान प्रक्रिया झाली़ जिल्ह्यातील ८५७ मतदारांपैकी ८४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, ९८़९५ टक्के मतदान झाले आहे़ तर ८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली असून, एका मतदाराला नावात बदल असल्याने मतदानापासून वंचित रहावे लागले़ राष्ट्रवादी-भाजपा विरूध्द काँग्रेस- शिवसेना अशा दुरंगी लढतीतील चुरस पाहता शनिवारी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच बिनविरोधच्या चर्चेला सुरूवात झाली होती़ उस्मानाबाद ते मुंबई पर्यंत बिनविरोधसाठी चार बैठकाही झाल्या़ अर्ज मागे घेण्याच्या पूर्व संध्येला झालेल्या अखेरच्या बैठकीत जागा वाटपावर अंतीम तोडगा निघाला नाही़ त्यानंतर सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी विरूध्द महायुती अशी लढत होईल, असे तर्क लावले जात असतानाच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी- भाजपाने व काँग्रेस - शिवसेनेने एकत्रित पॅनल टाकल्याचे जाहीर केले़ जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहता राष्ट्रवादी काँग्रेसव काँग्रेसने यापूर्वी आघाडी करून जिल्हा बँकेसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लढविल्या आहेत़ मात्र, वेळोवेळी होणारी काँग्रेस व शिवसेनेची छुपी आघाडी सर्वश्रूत होती़ यंदाच्या निवडणुकीत प्रथमच उघडपणे काँग्रेस-शिवसेनेने पॅनल निवडणुकीत उतरविले होते़ तर भाजपा- राष्ट्रवादीने एकत्रित येवून पॅनल उभा केला होता़ प्रचारादरम्यान राष्ट्रवादी- भाजपाकडून आ़ राणाजगजितसिंह पाटील, माजी खा़डॉ़पद्मसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी तर शिवसेना- काँग्रेसकडून आ़ मधूकरराव चव्हाण, आ़ बसवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, तानाजी सावंत, माजी आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह रासपाचे आ़ महादेव जानकर यांनी प्रचारात उडी घेतली होती़ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत थेट मतदारांपर्यंत पोहचून प्रचार यंत्रणा राबविण्यात आली़ दोन्ही पॅनलकडून बँकेला शासनाकडून मदत मिळवून देण्याचा विश्वास मतदारांसह सर्वसामान्य सभासद, ठेवीदारांना प्रचारादरम्यान देण्यात आला आहे़ सर्वच गटातील मतदार आणि संस्थांवरील सत्ता पाहता विजयाचे आखाडे बांधण्यात आले आहेत़ प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थेट मतदारांशी संपर्क साधून प्रचार यंत्रणा राबविण्यात आली़ जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रावर गुरूवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत ८५७ मतदारांपैकी ८४८ जणांनी मतदान केले़ जिल्ह्यात सरासरी ९८़९५ टक्के मतदान झाले़ सर्वच मतदान केंद्रावर उमेदवारांसह नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती़ जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया झाली़ पोलीस प्रशासनानेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ ३८ उमेदवारांचे भवितव्य गुरूवारी मतपेटीत बंद झाले असून, शनिवारी उस्मानाबाद येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील महसूल भवनमध्ये मतमोजणी प्रक्रिया होणार आहे़ या मतमोजणीकडे उमेदवारांसह अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़(प्रतिनिधी)जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी-भाजपा विरूध्द काँग्रेस- शिवसेना अशी झाली असली तरी ८ अपक्षांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे़ यातील महेंद्र धुरगुडे यांनी सतीश दंडनाईक यांना पाठींबा दिला होता़ उर्वरित सात अपक्ष उमेदवार किती मतदान खातात याचीही चिंता संबंधित गटातील दोन्ही पॅनलधमील उमेदवारांना आहे़उमरगा तालुक्यातील सोसायटी मतदार संघातील धाकटीवाडी गावातील मतदार लक्ष्मण शिवाजी सास्तुरे यांचे मतदार यादीत लिंबाजी शिवाजी सास्तुरे असे नाव झाले होते़ त्यामुळे मतदार यादीतील नावात बदल झाल्यामुळे सास्तुरे यांना मतदानापासून वंचित रहावे लागले आहे़ उस्मानाबाद तालुक्यातील इतर शेती गटातील मतदार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, वाशी तालुक्यातील विकासे मधील इंदापूरचे सरपंच रमेश पाटील, पार्डी येथील विलास चौधरी, तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील उत्तमराव लोमटे, तर उमरगा तालुक्यातील पुष्पा कदम, जितेंद्र शिंदे, अजय मोरे व इतर एकाने मतदानाकडे पाठ फिरविली असून, एकाच्या मतदार यादीतील नावात घोळ झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही़