शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

९५० धार्मिक स्थळे नियमित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:56 IST

शहरातील विविध धर्मीयांसाठी आनंदाची बाब म्हणजे तब्बल ९५० धार्मिक स्थळे लवकरच अधिकृत होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील विविध धर्मीयांसाठी आनंदाची बाब म्हणजे तब्बल ९५० धार्मिक स्थळे लवकरच अधिकृत होणार आहेत. महापालिकेने खंडपीठाच्या आदेशानुसार नागरिकांचे म्हणणे एकूण घेऊन ९९ टक्के धार्मिक स्थळे अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकृत धार्मिक स्थळांची यादीही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी मोजकीच धार्मिक स्थळे काढण्यात येतील.शहरातील ११०० धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवून महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी पाडापाडीला सुरुवातही केली होती. महापालिकेने शहरातील ४४ धार्मिक स्थे काढण्याचे कामही केले. सर्वोच्च न्यायालय, खंडपीठाचा हवाला देत महापालिकेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. विविध धर्मांचे नागरिक आपापले धार्मिक स्थळ वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. धार्मिक स्थळ पाडण्यापूर्वी महापालिकेने नागरिकांचे म्हणणेच एकूण घेतले नव्हते. त्यापूर्वीच यादी अंतिम करून खंडपीठासमोर सादर केली होती. अलीकडे खंडपीठाने दिलेल्या एका आदेशात नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे असे मनपाला सांगितले. महापालिकेने यासाठी सहा वेगवेगळी पथके तयार करून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.दरम्यान, मंगळवारी महापालिकेतर्फे धार्मिक स्थळांची सुनावणी घेण्यात आली. १५ ते २० नागरिकांचीच यावेळी उपस्थिती होती. ७ आक्षेपांवर यावेळी सुनावणी घेण्यात आल्याचे आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, उपायुक्त अय्युब खान, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दीकी, हेमंत कोल्हे, सी.एम. अभंग यांच्यासह सिडको, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाºयांची उपस्थिती होती. सात आक्षेपांवरील सुनावणी घेतल्यानंतर मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर माहिती देताना म्हणाले की, शहरातील ब वर्गातील धार्मिक स्थळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.पोलिसांकडून ही धार्मिक स्थळे वाहतुकीस अडचण निर्माण करणारी आहेत का?, लोकमान्यता आहे का?, याचा अहवाल मागवण्यात येणार आहे. पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. यापुढे कोणालाही म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.