शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार पुरुषांमागे ९१३ महिला मतदार

By admin | Updated: September 13, 2014 23:05 IST

परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदारांची यादी जाहीर केली असून, या यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९१३ महिलांचे प्रमाण आहे.

परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदारांची यादी जाहीर केली असून, या यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९१३ महिलांचे प्रमाण आहे. मध्यंतरी स्त्री-पुरुष गुणोत्तर बिघडल्याने राज्यात ही एक समस्या निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने महिला मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याने या गुणोत्तराचा चढता आलेख यादीत दिसत आहे.मुलांच्या जन्मदराच्या तुलनेत मुलींचा जन्मदर घटल्याने ही एक सामाजिक समस्या निर्माण झाली होती. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासन पातळीवर मोठे प्रयत्न झाले. बेटी बचाव अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा परिणाम हळूहळू होत गेला. मागील लोकसभा निवडणूक काळात जिल्ह्यात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला.जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे मतदार नोंदणीलादेखील चांगला प्रतिसाद मिळत गेला. मतदारांची संख्या वाढली. परंतु मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर दर हजारी पुरुषांमागे स्त्री मतदारांचे प्रमाण ८३० च्या आसपास राहिले. मतदार यादीतही स्त्री-पुरुष गुणोत्तर असमतोल असल्याचेच निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा महिला मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन प्रयत्न झाले. अनेकवेळा वयाचा पुरावा नसल्याने मतदारयादीत महिलांचे नाव येत नाही. ग्रामीण भागात ही समस्या प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे मतदार नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने वयाच्या पुराव्यासाठीही विविध पर्याय खुले केले होते. वर्षभर राबविलेल्या या कार्यक्रमाला यश आले असून, सध्या जाहीर झालेल्या मतदार यादीत पुरुषांच्या तुलनेत ९१३ महिला मतदारांनी नोंदणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविला. महिला मतदारांच्या नोंदणीबरोबरच १८ ते १९ वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे मतदारयादीत नवमतदारांची संख्याही वाढली आहे. जवळपास ३० हजार ५०० नवमतदारांनी नावनोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)