शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

९०० नवजात शिशू पोलिओ लसीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:47 IST

गोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटी रुग्णालयात तब्बल १५ दिवसांपासून पोलिओची लसच (ओरल व्हॅक्सिन) उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवजात शिशुंना पोलिओ लस देणे महत्त्वपूर्ण असून, गेल्या काही दिवसांत घाटीत जन्मलेल्या ९०० पेक्षा अधिक शिशुंनाही लस मिळाली नाही. त्यामुळे या नवजातांना पोलिओ होण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देधक्कादायक : घाटीत १५ दिवसांपासून पोलिओ लसच नाही, एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटी रुग्णालयात तब्बल १५ दिवसांपासून पोलिओची लसच (ओरल व्हॅक्सिन) उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवजात शिशुंना पोलिओ लस देणे महत्त्वपूर्ण असून, गेल्या काही दिवसांत घाटीत जन्मलेल्या ९०० पेक्षा अधिक शिशुंनाही लस मिळाली नाही. त्यामुळे या नवजातांना पोलिओ होण्याचा धोका आहे.घाटी रुग्णालयात वर्षभरात १७ हजारांहून अधिक प्रसूती आणि ४ हजारांवर सिझेरियन प्रसूती होतात. यामध्ये दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. जन्मल्यानंतर पहिल्या २४ तासांत पोलिओचा ओरल डोस देणे महत्त्वाचे असते. घाटीतील वॉर्ड क्रमांक ३० मध्ये नवजात बालकांना ही लस देण्यात येते. आजघडीला ही लसच घाटीत उपलब्ध नाही. त्यामुळे प्रसूतीनंतर नवजात बालकांना पोलिओ लस देण्यासाठी नंतर घेऊन येण्याचा सल्ला घाटीतील डॉक्टर देत आहेत. त्यामुळे बाळांना घेऊन पालकांना महापालिकेची रुग्णालये गाठण्याची वेळ येत आहे.देशात पोलिओ निर्मूलनासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. परंतु पोलिओ लस तुटवड्याने त्यास खोडा बसत आहे. घाटी रुग्णालयास महापालिकेकडून या लसीचा पुरवठा होतो. त्यामुळे महापालिकेकडे बोट दाखवून घाटी प्रशासन मोकळे होत आहे. तर वरिष्ठ पातळीवरूनच पुरवठा नसल्याने तुटवडा असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. घाटीत कावीळ ब लसीचाही चार दिवस पुरेल इतकाच साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मंगळवारी देणारपोलिओ लसीचा पुरवठा सध्या कमी प्रमाणात आहे. मनपाच्या रुग्णालयांत थोड्याफार प्रमाणात लस उपलब्ध आहे. सोमवारी लस उपलब्ध झालेल्या असून, मंगळवारी घाटीला देण्यात येतील. बाळांना महिनाभरात लस देता येते. त्यामुळे कोणालाही पोलिओ होण्याचा धोका नाही, असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर म्हणाल्या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी