शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रे संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:42 IST

 या संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा असेल

औरंगाबाद : जिल्ह्यात तीन मतदान केंद्रे उपद्रवी, तर ८८ मतदान केंद्रे, संवेदनशील आहेत.  या संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तसेच स्वतंत्र सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक केल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यात ३०६७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी ८८ केंद्रे संवेदनशील असून, यातील ३ केंद्रे उपद्रवी आहेत. मतदान केंद्रांवर प्रमाणापेक्षा कमी मतदान झाले, एकाच उमेदवाराला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होणे, सिंगल मतदारांची संख्या अधिक असणे, मतदान केंद्राला हिंसाचाराचा इतिहास असेल, तर ती केंद्रे संवेदनशील ठरविण्यात येतात. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त फौजफाटा तैनात असेल. या केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक नेमले जातील, त्यांचा अहवाल आयोगाकडे पाठविण्यात येईल. जिल्ह्यामधील ३२३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येईल.

संवेदनशील मतदान केंद्रेजिल्ह्यातील ८८ संवेदनशील मतदान केंद्रे असून, यापैकी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ६४, तर २४ जालना मतदारसंघामध्ये येतात. यामध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा  १८, औरंगाबाद मध्य १३, औरंगाबाद पश्चिम १८, कन्नड ८, गंगापूर ४, वैजापूर ३, सिल्लोड ९, फुलंब्री ९, तर पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये ७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019