शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

८५ कोटी रुपयांचा आॅनलाईन वीज बिल भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:50 IST

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांतील ४ लाख ६२ हजार ८९ विद्युत ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल ८५ कोटी ४१ लाख रुपयांचे वीज बिल आॅनलाईनच्या माध्यमातून भरणा केले आहे.

ठळक मुद्देमहावितरण : औरंगाबाद प्रादेशिक विभागातील ११ जिल्हे

औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांतील ४ लाख ६२ हजार ८९ विद्युत ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल ८५ कोटी ४१ लाख रुपयांचे वीज बिल आॅनलाईनच्या माध्यमातून भरणा केले आहे.आॅनलाईन वीज बिल भरणा करण्यासाठी वीज ग्राहकांना प्रोत्साहित करण्यात येत असून, यासाठी ०.२५ टक्के सूट दिली जाते. ग्राहकांना वीज बिल पाहणे आणि ते आॅनलाईन भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डसह मोबाईल वॅलेट आणि कॅश कार्ड व इतरही अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यावर वीज बिल भरल्याच्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. महावितरण कंपनीकडून आॅनलाईन वीज बिल भरणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.वीज ग्राहकांना कधीही आणि कोठूनही वीज बिल भरण्याची आॅनलाईन सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्यांचेही बिल भरण्याची सेवा उपलब्ध आहे. ज्यामुळे रांगेत उभे राहण्याची गरज नाही तसेच बिल मिळाले नाही, याची चिंताही यामुळे मिटली आहे. मोबाईल अ‍ॅपवरून वीज बिलाचा भरणा सहज करता येतो. वीज बिल भरणा केंद्राच्या रांगेत थांबण्यापेक्षा घरबसल्या अगदी इंटरनेट, मोबाईलसह इतर अनेक सुविधांद्वारे वीज बिल भरणा करणारांची संख्या झपाट्याने वाढत आहे.चौकट...परिमंडळ कार्यालय ग्राहक संख्या रक्कम (कोटी)औरंगाबाद १,२६,०१७ २८.४६जळगाव १,६६,०२७ ३०.१५लातूर १,०५,०३८ १५.६८नांदेड ६५,००७ ११.१२एकूण ४,६२,०८९ ८५.४१

टॅग्स :electricityवीजPaytmपे-टीएमAurangabadऔरंगाबाद