शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

जिल्ह्यातील ८२६ प्रकरणात झाली आपापसात तडजोड

By admin | Updated: April 9, 2017 23:37 IST

उस्मानाबाद : येथील न्यायालयात राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत पार पडली.

उस्मानाबाद : येथील न्यायालयात राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. यात विविध स्वरुपाच्या ८२६ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात येऊन मोटार अपघात, कामगार नुकसान भरपाई प्रकरणात पक्षकारांना १ कोटी ७ लाख ६१ हजार रुपयांचा मावेजा देण्यात आला.पक्षकार, विधिज्ञ मंडळ, जिल्हा सरकारी वकील यांच्या हस्ते लोकअदालतीचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर.आर. देशमुख, प्राधिकरणाचे सचिव एस.आर. पडवळ, सर्व न्यायिक अधिकारी, उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष निलेश बारखेडे, उपाध्यक्ष रमेश भोसले, जिल्हा सहाय्यक सरकारी वकील जयंत देशमुख यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.या लोकअदालतीत जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रलंबित प्रकरणे तसेच दावापूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यासाठी ठेवण्यात आली होती. यापैकी दिवाणी स्वरुपाची ४४९,मोटार अपघात, कामगार नुकसानभरपाईची १६,भूसंपादन १०४,फौजदारी १६४,तडजोडपात्र, वैवाहिक संबंधाची ११, धनादेशाची ६२, तर विविध बँकांची २० दावापूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली. मोटार अपघात, कामगार नुकसानभरपाई प्रकरणामधील पक्षकारांना १ कोटी ७ लाख ६१ हजार रुपयांचा मावेजा देण्यात आला. धनादेश प्रकरणात फिर्यादी पक्षाला २८ लाख ५९ हजार ९१४ रुपयांची वसुली करून देण्यात आली. भूसंपादन प्रकरणामध्ये ११ कोटी २० लाख ८० हजार ८०४ रुपये मावेजा मंजूर होऊन रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली. तसेच काही वसुली दरखास्तीमध्ये ५२ लाख ५३ हजार ३३२ रुपयांची वसुली मिटविण्यात आली असून, २० दावापूर्व प्रकरणामध्ये १ लाख ५ हजार १०० रुपये रकमेची तडजोड झाली. अदालतीमध्ये न्यायिक अधिकारी म्हणून एस.आय. पठाण, आर. एन. रोकडे, एस.आर. पडवळ, डॉ.रचना तेहरा, एस.बी. देसाई, आर. के. राजेभोसले, एन. पी. पवार, एस.ए. जमादार, ए.सी. पारशेट्टी, ए. एस. बिराजदार, ए.ए. बाबर आदींनी काम पाहिले. (प्रतिनिधी)