शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

स्पा सेंटरचा रोजचा गल्ला आठ लाख रुपयांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:05 IST

प्रोझोन मॉलमधील स्पामध्ये चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर दोन स्पा सेंटरवरील रोजचा गल्ला आठ लाखांचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी धाड मारली तेव्हा तेथे ८ लाख ५० हजार रुपयांची रोकड मिळाली. ही रक्कम एक दिवसाच्या व्यवसायाची असल्याचे तेथील व्यवस्थापकाने पोलिसांना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील स्पामध्ये चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर दोन स्पा सेंटरवरील रोजचा गल्ला आठ लाखांचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी धाड मारली तेव्हा तेथे ८ लाख ५० हजार रुपयांची रोकड मिळाली. ही रक्कम एक दिवसाच्या व्यवसायाची असल्याचे तेथील व्यवस्थापकाने पोलिसांना सांगितले.गुरुवारी रात्री झालेल्या कारवाईविषयी अधिक माहिती देण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी सिडको ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, मसाज पार्लरच्या नावाखाली दी स्ट्रेस स्पा आणि अनंतरा स्पामध्ये छुप्या मार्गाने आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट सुरू होते. या रॅकेटविषयी माहिती मिळताच पोलिसांनी गुरुवारी रात्री डमी ग्राहक पाठवून तेथे छापा मारला.या छाप्यात पोलीसांनी नऊ विदेशी मुलींना ताब्यात घेतले होेते. तर तीन ग्राहक आणि स्पामधील सात कर्मचाºयांना अटक केली होती. दोन्ही स्पा मुंबईतील एकच व्यक्ती चालवीत असल्याचे समोर आले. त्याच्या मालकाचे अचूक नाव अद्याप समोर आले नाही. आरोपी शशांक खन्ना हा अनंतरा स्पाचा एरिया मॅनेजर आहे. दी स्ट्रेस स्पा येथे येथे सुनील कचरू नवतुरे व शेख तौफिक शेख अफसर हे दोघे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करीत होते. तर रूम बॉय म्हणून आरोपी राहुल माणिकराव नलावडे काम करायचा. त्यांनाही पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अनिता जमादार, निरीक्षक सुरेंद्र माळाळे, निरीक्षक किरण पाटील, निर्मला परदेशी, उपनिरीक्षक विद्या रणेर, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी केली होती.दोन्ही स्पामधून पकडलेल्या आरोपींना शुक्रवारी पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी कडक बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर केले असता. तेव्हा पोलिसांनी आरोपींना सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ग्राहकांना ११ डिसेंबरपर्यंत तर मॅनेजर आणि कर्मचाºयांना १२ डिसेंबरपर्र्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. एका कर्मचाºयातर्फे अ‍ॅड. संदीप राजेभोसले यांनी काम पाहिले, त्यांना अ‍ॅड. सुधीर घोंगडे यांनी सहकार्य केले.अटक करण्यात आलेले ग्राहकरोहन राजेंद्र कुलकर्णी, (२६, रा. सिडको), अकीब अक्रम खान पटेल (२३, रा.उस्मानपुरा), प्रदीप शंकरलाल शर्मा (५२, रा. पवननगर हडको) आणि येमेन अब्दुल हमीद (रा. इराक).अटक करण्यात आलेले कर्मचारीअनंतरा स्पाचा एरिया मॅनेजर शशांक खन्ना आणि सहव्यवस्थापक स्वाती खामकर (३०), रमा बोराडे (रा. ब्रिजवाडी), डी स्ट्रेस हबचा सहायक मॅनेजर सुनील कचरू नवतुरे, शेख तौफिक शेख अफसर आणि रूमबॉय राहुल माणिकराव नलावडे.त्या विदेशी मुली सुधारगृहातवेश्या व्यवसाय करून घेण्यासाठी विदेशातून आणण्यात आलेल्या ९ मुलींची रवानगी न्यायालयाच्या आदेशाने महिला सुधारगृहात शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.प्रोझोन मॉललापोलिसांची क्लीनचीटदोन स्पावर पोलिसांनी कारवाई करुन रॅकेट उघडकीस आणले आहे, मात्र या प्रकरणात प्रोझोन मॉल प्रशासनाचा दोष नसल्याचे पोलीस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मॉलमध्ये चालविण्यात येणाºया अनंतरा स्पा आणि डी ट्रेस हब या दोन स्पाचा कॉन्ट्रॅक्ट प्रोझोन मॉलने रद्द केला आहे.