शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात घाटी रुग्णालयात ७५ दिवसांत ७९४ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 16:31 IST

टाळेबंदी काळात घाटीच्या शल्यचिकित्साशास्त्र विभागाची कामगिरी

ठळक मुद्दे१४० मोठ्या, तर ६५४ लहान सर्जरींचा समावेश दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्याही शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात गेल्या ७५ दिवसांत तातडीने गरजेच्या असलेल्या तब्बत ७९४ शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात पार पडल्या. यात १४० मोठ्या, तर ६५४ लहान सर्जरींचा समावेश आहे. त्यापैकी दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्याही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ते रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर एक पॉझिटिव्ह रुग्ण शस्त्रक्रियेसाठी भरती आहे. त्याच्यावर शल्यचिकित्साशास्त्र विभाग उपचार करीत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली.

कोरोना संक्रमण सुरू झाल्यावर अडीच महिन्यांच्या काळात अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू ठेवून ऐच्छिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरोजनी जाधव यांच्या मार्गदर्शनात गरजेच्या शस्त्रक्रिया सुरू असून, पुढे  ऐच्छिक शस्त्रक्रिया हळूहळू रुळावर आणण्याचे काम सध्या घाटी रुग्णालयात सुरू आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणजेच मेडिसिन इमारतीच्या वॉर्ड २ मध्ये आॅपरेशन थिएटरची व्यवस्था करण्यात आली. तिथे एक सर्जरी आणि तीन सिझेरियन करण्यात आले. यासाठी विभागातील आरोग्य कर्माचारी, परिचारिका, निवासी डॉक्टरांना संसर्ग होणार नाही यासाठी विभागप्रमुख डॉ. जाधव विशेष काळजी घेत आहेत, तर सर्जिकल इमारतीत नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण अनलॉक १ सुरू झाल्यापासून वाढायला सुरुवात झाली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोरोनाबाधित दोघांची शस्त्रक्रिया- कन्नड तालुक्यातील ४२ वर्षीय बाधित व्यक्तीला पोटदुखीचा त्रास होता. त्यांची तातडीने अ‍ॅपेंडिक्सची शस्त्रक्रिया करावी लागली. डॉ. हरबडे यांच्या पथकातील डॉ. जुनेद अथर यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली, तर शाहबाजार येथील मधुमेह असलेल्या ४५ वर्षीय बाधित व्यक्तीला झालेल्या मोठ्या जखमेला दररोज साफ करण्याचे काम डॉ. अनंत बीडकर यांच्या पथकातील डॉ. सचिन जंगले यांच्या टीमने केले.

- हा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यावर सर्जरी विभागात पुढील उपचार घेत असून, स्वादुपिंडाचा दाह असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ४० वर्षीय बाधित रुग्णावर उपचार सुरू असून, डॉ. सरोजनी जाधव, डॉ. अनिता कंडी, डॉ. मोबीन अन्सारी, डॉ. गजानन चौधरी आदी उपचार करीत आहेत.  

महिना    मोठ्या शस्त्रक्रिया     लहान शस्त्रक्रियाएप्रिल         ६७                                 २७६मे              ४२                                    २५०जून(१५ जूनपर्यंत)    ३१                    १२८ 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद