शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शहरातील ९ रस्त्यांसाठी ७९ कोटीचा प्रस्ताव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 15:02 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग शहरातील ९ रस्त्यांसाठी ७९ कोटी रुपयांची मागणी करणारे प्रस्ताव बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ठेवणार आहे.

ठळक मुद्देसिडको बसस्थानक येथील ट्रँगल रुंदीकरणासह ९ महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश आहे.७९ कोटी रुपयांची मागणी करणारे प्रस्ताव बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ठेवणार आहे.

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभाग शहरातील ९ रस्त्यांसाठी ७९ कोटी रुपयांची मागणी करणारे प्रस्ताव बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ठेवणार आहे. त्यामध्ये सिडको बसस्थानक येथील ट्रँगल रुंदीकरणासह ९ महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश आहे. बुधवारी दुपारी बांधकाममंत्री शहरात येत आहेत. दुपारनंतर ते मुख्य अभियंता एम.एम. सुरकुटवार यांच्या दालनात खड्डेमुक्त अभियान, इमारती व रस्त्यांची प्रलंबित कामे व इतर कामांचा आढावा घेणार आहेत. बैठकीला कनिष्ठ अभियंत्यांपर्यंत सर्वांना बोलावण्यात आले आहे. 

सूत्रांनी सांगितले, पाच ते सहा महत्त्वाच्या रस्त्यांना मंजुरी मिळावी, असा प्रयत्न आहे. विमानतळ ते नगरनाका, हर्सूल टी-पॉइंट ते महानुभव आश्रम, पैठण लिंक रोड, ए.एस. क्लब ते शिर्डी, नगरनाका ते शरणापूर, फुलंब्री ते खुलताबाद, वैजापूर ते नेवरगाव ते मांजरी २० कि़मी., अजिंठा ते अजिंठा लेणी ५ कि़मी, सिडको बसस्थानक ते वसंतराव नाईक चौक रस्ता रुंदीकरणासाठी तातडीचे प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत. शिवाय जालना ते अंबडमार्गे वडीगोद्री या रस्त्याच्या कामासाठीही निधी मागण्यात येणार आहे. सर्व मिळून ७९ कोटी रुपयांचा तातडीचा निधी बांधकाम विभागाला मिळावा, यासाठी अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी प्रस्ताव तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

६४ कोटी लागणार खड्डे बुजविण्यासाठीऔरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांसाठी खड्डे बुजविण्यासाठी ६४ कोटी लागणार आहेत. औरंगाबादेत ११४ कामांतील १,९९४ कि़मी. रस्त्यांना ४३ कोटी, तर जालन्यातील ५७ कामांतील ६८७ कि़मी. रस्त्यांना साडेएकवीस कोटी रुपये लागणार आहेत. दोन्ही मिळून १७१ कामे असून, ३ हजार ८१ कि़मी. रस्त्यांचा त्यात समावेश आहे. पूर्ण विभागाचा आढावा घेतल्यानंतर बांधकाममंत्री विभागासाठी काय देणार याची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.