शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

जिल्ह्यातील ७७ प्रकल्प कोरडेठाक

By admin | Updated: August 26, 2014 00:28 IST

उस्मानाबाद : पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही. अत्यल्प पावसावरच बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या असून

उस्मानाबाद : पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही. अत्यल्प पावसावरच बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या असून, दुसरीकडे पावसाअभावी जिल्ह्यातील लहान मोठे मध्यम ७७ प्रकल्प कोरडेठाक आहेत. ९६ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत असून, येत्या काही दिवसांत मोठा पाऊस नाही झाल्यास या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षापासून पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याने विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी कमालीची घटत चालेली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यातील १९२ गावात तीव्र तर ५०३ मध्यम स्वरुपांची पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पावसाळा सुरु असतानाही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणी साठ्यात अपेक्षीत वाढ झालेली नाही. पावसाअभावी तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेल्यात जमा असून, खरीप पिके व पाणीटंचाईची परिस्थितीही गंभीर बनली आहे.जिल्ह्यात एक मोठा, सतरा मध्यम तर १९३ लघु प्रकल्प व साठवण तलाव आहेत. जिल्ह्यातील एकमेव मोठा असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. सतरा मध्यप्रकल्पांपकी केवळ एका प्रकल्पात २५ ते ५० टक्के पाणी साठा, सहा प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी तर सहा जोत्याखाली तर चार कोरडे पडले आहेत. जिल्ह्यात ९१३ लघु प्रकल्प असून, यातील केवळ २ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तसेच चार प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा, २५ प्रकल्पात २५ टक्के पेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. ८९ प्रकल्प जोत्याखाली तर ७३ प्रकल्प कोरडे पडले असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.सद्यस्थितीत कळंब तालुक्यातील रायगव्हाण, परंडा तालुक्यातील चांदणी, खंडेश्र्वर, साकत, मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. लघु प्रकल्पामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, कोलेगाव, करजखेडा, घुगी, येवती, टाकळी , केशेगाव, सांजा, जागजी, आळणी, बेंबळी, गोपाळवाडी, पाडोळी (आ), बोगरगाव राजे, धुत्ता, कोंड , तुळजापूर तालुक्यातील कुनसावळी, सलगरा मडडी, व्होर्टी, केमवाडी, खुदावाडी, कदमवाडी, केशेगाव, फुलवाडी, बंचाई, गंजेवाडी, ढेकरी, खंडाळा, येडोळी, चिकुंद्रा, उमरगा तालुक्यातील कसमलवाडी, कोरगाववाडी, केसरजवळगा, कून्हाळी, अलूर, सुपतगाव, पेंठ सागवी, सरोडी, कालनिंबाळा, बलसुर, कोराळ, जेवळी, गुंजोटीवाडी, लोहारा तालुक्यातील माळेगाव, कळंब तालुक्यातील देवधानोरा, शिराढोण, कोठाळवाडी, ढोराळा, भाटसांगवी, आडसुळवाडी, नागुलगाव, बारातेवाडी, येडेश्र्वरी, भूम तालुक्यातील बागलवाडी, गोरमाळा, हिवरडा, गिरलगांव, घुलेवाडी, डुककरवाडी, उमाचीवाडी, जांब, तर वाशी तालुक्यातील दहिफळ, हातोला तर पंरडा तालुक्यातील अनाळा, सोनारी, अंबी, जेजली, मुगाव, तित्रज , तांबेवाडी, शेळगाव व वाटेफळ हे लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच राहिले आहेत. (प्रतिनिधी)