लातूर : लातूर जिल्ह्यातील चार नगरपंचायतींसाठी रविवारी सरासरी ७७ टक्के मतदान झाले असून, देवणी, जळकोट, शिरुर अनंतपाळ आणि चाकूर नगरपंचायतींचा यात समावेश आहे़ देवणी नगरपंचायतीसाठी ७४़४५, जळकोट ८३़६६, शिरुर अनंतपाळ ८१़१२, चाकूर नगरपंचायतीसाठी ७८़७० टक्के मतदान झाले़ या चारही नगरपंचायतीचे मतदान शांततेत झाले़ देवणी नगरपंचायतीच्या १७ जागेसाठी ९३, जळकोट ७९, शिरुर अनंतपाळ ६७ आणि चाकूर नगरपंचायतीसाठी ७५ असे एकूण ३१४ उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी ५़३० वाजता मतदान यंत्रात बंद झाले़ सोमवारी सकाळी १० वाजता या चारही नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी त्या-त्या तहसील कार्यालयात होणार आहे़ प्रती नगरपंचायतीसाठी एकूण ६ टेबलवर मतमोजणी होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत चारही नगरपंचायतीचा निकाल हाती येईल, अशी शक्यता आहे़ नगरपंचायती अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत असल्याने निकालाची उत्सुकता आहे़ देवणी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीची उत्सुकता रविवारी अनुभवास आली़ १६ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी १६ केंद्रावरुन मतदान घेण्यात आले़ त्यामध्ये ७४़४५ टक्के मतदारांनी आपले कर्तव्य बजावत एकूण ९३ उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद केले आहे़ कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय ही प्रकिया देवणी शांततेत पार पडली़ देवणी नगरपंचायत १७ सदस्यांची आहे़ परंतु, प्रभाग १० मधील जागा काँग्रेसकडे बिनविरोध गेली आहे़ त्यामुळे उर्वरित १६ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली़ शहरातील १६ केंद्रांवरुन एकूण ८ हजार ९८४ पैैकी ६ हजार ६८९ मतदारांनी आपला हक्क बजावला़ शहरातील मतदारांची संख्या ९५०७ असली तरी प्रभाग १० मधील ५२३ मतदारांना आपला हक्क बजावण्याची संधी मिळाली नाही़ प्रभाग १ मध्ये एकूण ८२९ मतदार आहेत़ त्यापैैकी ६४५ (७७़८०%) मतदारांनी आपले कर्तव्य बजावले़ प्रभाग २ मधील ६९८ पैकी ४९० (७०़२५%), प्रभाग ३ मधील ४८० पैकी ३९१ (८१़४५%), प्रभाग ४ मधील ४२७ पैकी ३३९ (७९़३९%), प्रभाग ५ मधील ५१९ पैकी ३५१ (६७़६३%), प्रभाग ६ मधील ५४४ पैकी ३९७ (७२़९७%), प्रभाग ७ मधील ६०२ पैकी ४५४ (७५़४१%), प्रभाग ८ मधील ६०२ पैकी ४६९ (७७़९०%), प्रभाग ९ मधील ३२४ पैकी २६७ (८२़४०%), प्रभाग ११ मधील ३७९ पैकी ३१२ (८२़३२%), प्रभाग १२ मधील ७१७ पैकी ५१४ (७१़६८%), प्रभाग १३ मधील ५४५ पैकी ३७७ (६९़१७%), प्रभाग १४ मधील ४६५ पैकी ३१८ (६८़३०%), प्रभाग १५ मधील ६०२ पैकी ४३१ (७१़५०%), प्रभाग १६ मधील ६०९ पैकी ४४६ (७३़२३%) तर प्रभाग १७ मधील ६४२ पैकी ४८८ (७६ %) मतदारांनी आपला हक्क बजावला आहे़ देवणी शहरात सकाळपासून मतदानाचे औत्सुक्य दिसून आले़ विशेषत: युवकांमध्ये पहिल्या नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाची उत्सुकता दिसून आली़ सध्या सोयाबीन काढणीचे काम सुरु असल्याने शेतकरी व शेतमजूर मतदारांनी सकाळी लवकरच आपला हक्क बजावला़ त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदानाला गती मिळाली होती़ त्यानंतर सरासरी मतदान होत गेले़ चाकुरातील वार्डनिहाय मतदान वार्ड क्ऱ १ मध्ये ४५८ पैकी ४१५, वार्ड क्ऱ १/२ मध्ये २२१ पैकी १८७, वार्ड क्ऱ २ मध्ये ७१४ पैकी ५०९, वार्ड क्ऱ ३ मध्ये ८३५ पैकी ६८१, वार्ड क्ऱ ४ मध्ये ८२२ पैकी ६४७, वार्ड क्ऱ ५ मध्ये ५८८ पैकी ५०३, वार्ड क्ऱ ६ मध्ये ८२९ पैकी ५७७, वार्ड क्ऱ ७ मध्ये ७२७ पैकी ५७२, वार्ड क्ऱ ८ मध्ये ४३९ पैकी ३७१, वार्ड क्ऱ ९ मध्ये ६८१ पैकी ५०५, वार्ड क्ऱ १० मध्ये ८७६ पैकी ६४८, वार्ड क्ऱ ११ मध्ये ७५१ पैकी ५८२, वार्ड क्ऱ १२ मध्ये ९०३ पैकी ७३६, वार्ड क्ऱ १३ मध्ये ९१४ पैकी ७४३, वार्ड क्ऱ १४ मध्ये ६६८ पैकी ५५८, वार्ड क्ऱ १५ मध्ये ७२८ पैकी ५२४, वार्ड क्ऱ १६ मध्ये ८७३ पैकी ७१३ तर वार्ड क्ऱ १७ मध्ये ७४९ पैकी ५८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला़
नगरपंचायतींसाठी ७७ टक्के मतदान
By admin | Updated: November 2, 2015 00:18 IST