शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

७६ कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:27 IST

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुंबई कार्यालयामार्फत शहरातील २१९ कि़मी.च्या रस्त्यांना निधी देण्यासाठी मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुंबई कार्यालयामार्फत शहरातील २१९ कि़मी.च्या रस्त्यांना निधी देण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यांनी हा निधी दिल्यामुळे जालना रोड, बीड बायपासचे काम अधांतरी राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण महावीर चौक ते विमानतळ या रस्त्याचादेखील २१९ कि़मी.च्या प्रस्तावात समावेश आहे. दुधाची तहान ताकावर भागविण्याची वेळ यानिमित्ताने आली आहे.हा निधी मिळावा, यासाठी गेल्या आठवड्यात गडकरी यांना एक प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील त्यांच्याकडे या प्रस्तावाबाबत चर्चा केली होती. त्यानुसार गडकरी यांनी ७६ कोटींतून करण्यात येणा-या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली असून, दोन दिवसांत मुंबई कार्यालयातील मुख्य अभियंता विनय देशपांडे त्यासाठी अधिसूचना काढतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.हजारो कोटींच्या कामांच्या घोषणा केल्या त्याबाबत अजून काही निर्णय नाही. किमान ८० कोटींचा निधी तरी द्या, अशी मागणी स्थानिक पातळीवरील राज्यकर्त्यांनी गडकरींकडे पत्रांद्वारे केली होती. महिनाभरातच हा सगळा खेळ जमवून आणला आहे. हे रस्ते किमान पाच वर्षे टिकतील, असा दावा करण्यात येत आहे.हे आहेत रस्ते...विमानतळ ते महावीर चौक (जालना रोड), हर्सूल टी पॉइंट ते महावीर चौक, पैठण लिंक रोड ते गोलवाडी, ए. एस. क्लब ते लासूर स्टेशन ते वैजापूर, फुलंब्री ते खुलताबाद, वैजापूर ते नेवरगाव ते मांजरी २० कि़ मी., फर्दापूर ते अजिंठा लेणी ५ कि़मी., सिडको बसस्थानक ते वसंतराव नाईक चौक रस्ता रुंदीकरण, आवा मालेगाव रस्त्यासाठी हा निधी मंजूर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.मुंबई एनएचएआय कार्यालयातील सूत्रांनी सांगितले, रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे; परंतु किती रस्ते व किती निधी याचे कुठलेही पत्र अजून आलेले नाही. ते आल्यानंतर अंमलबजावणी सुरू होईल.