‘कार’सेवेवर ७५ लाखांचा खर्चऔरंगाबाद : कार्यकारी संचालक ते उपअभियंत्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांसाठी ७५ लाख रुपये खर्च करून ८ अलिशान कार खरेदी करण्याचा घाट गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने घातला आहे. या ‘कार’ सेवेनिमित्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियम डावलून ‘दिवाळी’ भेट देण्याचे प्रयत्न होत आहेत.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव औरंगाबाद पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता सु. ह. खरात यांच्याकडे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार कार्यकारी संचालक आणि मुख्य अभियंता यांच्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांची इनोव्हा, स्वत: कार्यकारी अभियंत्यांसाठी १५ लाख रुपयांच्या दोन अॅम्बेसेडर आणि चार उपअभियंत्यांसाठी २० लाख रुपये खर्च\नियमानुसारच होईल खरेदीआठ चारचाकी वाहने खरेदीचा प्रस्ताव माझ्याकडे आला आहे; परंतु अद्याप त्यास मान्यता देण्यात आलेली नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच वाहनांची खरेदी केली जाईल.- सु. ह. खरात, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ
‘कार’सेवेवर ७५ लाखांचा खर्च
By admin | Updated: November 6, 2016 01:01 IST