शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

समाजकल्याणकडून ७४ लाखांची मदत

By admin | Updated: November 22, 2015 23:42 IST

राजकुमार जोंधळे , लातूर शांतताप्रिय आणि तंटामुक्त असलेल्या जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तब्बल २८८ दलित अत्याचाराचे गुन्हे घडले़ या २८८ पैकी २१० प्रकरणात पिडीत कुटुंबियांना समाजकल्याण

राजकुमार जोंधळे , लातूरशांतताप्रिय आणि तंटामुक्त असलेल्या जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तब्बल २८८ दलित अत्याचाराचे गुन्हे घडले़ या २८८ पैकी २१० प्रकरणात पिडीत कुटुंबियांना समाजकल्याण विभागाकडून ७३ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे़ २८८ पैकी ७८ प्रकरणे अनुदानासाठी पात्र ठरले नाहीत़ जिल्ह्यात वाढणाऱ्या दलित अत्याचाराच्या घटना या चिंताजनक आहेत़ या घटना घडू नयेत यासाठी समाजकल्याण आणि पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न होतात़ तरीही २८८ गुन्हे लातूरसारख्या जिल्ह्यात घडले आहेत हे विशेष़ दलित अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर समाजकल्याण विभागाकडून त्या घटनेची दखल घेतली जाते़ पोलिसाकडून प्राप्त झालेला अहवाल आणि समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांनी स्पॉट पंचनाम्याचा अहवाल असे दोन्ही अहवाल समाजकल्याण मंत्रालयाकडे पाठविले जातात़ या अहवालावर निर्णय झाल्यानंतर समाजकल्याणच्या जिल्हा कार्यालयाकडून संबंधीत पिडीत कुटुंबाला तीन टप्प्यामध्ये मदत दिली जाते़ घटनेचे गांभीर्य ओळखून ही मदत दिली जाते़ २०११-१२ मध्ये ५६ गुन्हे घडले़ यापैकी ४१ अ‍ॅट्रासिटी प्रकरणातील पिडीत कुटुुंबाला ६ लाख ७० हजार, २०१२-१३ मध्ये ४८ पैकी ४२ प्रकरणात ६ लाख ५० हजार, २०१३-१४ मध्ये ६६ पैकी ४८ प्रकरणात २६ लाख १० हजार, २०१४-१५ मध्ये ७७ पैकी ५६ प्रकरणात २२ लाख ४८ हजार आणि २०१५-१६ मध्ये आॅक्टोबर अखेरपर्यंत ४१ पैकी २३ प्रकरणात ११ लाख ९२ हजार रुपये असे एकूण ७३ लाख ७० हजार रुपयांचे अनुदान समाजकल्याण विभागाच्या वतीने वाटप करण्यात आले आहे़ अनुसुचित जाती-जमाती कायद्यांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने २१ आॅगस्ट २०१२ मध्ये अनुदान वाढीचा निर्णय घेण्यात आला़ पूर्वी देण्यात येणारे अनुदान हे संबंधीत पिडीत कुटुंबाला तुटपुंजे असल्याचे पुढे आले़ त्यानंतर या अनुदान वाढीवर मंत्रालय स्तरावर बैठका झाल्या़ त्यातून शेवटी शासन निर्णय युटीए २०१२/ प्रकरण २५९ प्रमाणे या अनुदान वाढीचे परिपत्रक समाजकल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आले़ मनोधैर्य योजना़़़४दलित अत्याचार प्रकरणी महिलांना मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते़ या अत्याचार प्रकरणामध्ये विशेषत: महिलांसाठी आर्थिक तरतुद करण्यात आली आहे़ विनयभंग, बलात्कार आणि खून प्रकरणात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून या योजनेंतर्गत विशेष आर्थिक मदत केली जाते़ महिलांचे खच्चीकरण होऊ नये यासाठी समुपदेशनही केले जाते, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील पाटील यांनी दिली़