शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

मतमोजणीसाठी ७०० कर्मचारी; चोख बंदोबस्त

By admin | Updated: May 14, 2014 23:54 IST

हिंगोली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी हिंगोलीच्या एमआयडीसी भागातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणार आहे.

 हिंगोली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी हिंगोलीच्या एमआयडीसी भागातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी ७०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील पोलिसही त्या ठिकाणी राहणार आहेत. हिंगोली लोकसभा मतदार संघातील वसमत, कळमनुरी, हिंगोली, उमरखेड, हदगाव व किनवट या विधानसभा क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे शासकीय तंत्रनिकेतनमधील स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. मतदान झाल्यापासून त्या ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था आहे. त्याच इमारतीत शुक्रवारी मतमोजणी केली जाणार आहे. ६ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी स्वतंत्र ६ सभागृह तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी १४ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. त्या ठिकाणी केंद्र शासनाचे निरीक्षक, सुपरवायझर, त्यांचे सहाय्यक असे एकूण १४ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात त्या-त्या मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियंत्रण ठेवणार असून, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कक्षात पोस्टल मतदानाची मोजणी होणार आहे. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेचे छायाचित्रीकरण केले जाणार असून, ६ सभागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पत्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, फोटो ग्राफर्स यांच्यासाठी तळमजल्यावर स्वतंत्र मीडिया कक्ष उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी मतमोजणीच्या प्रत्येक फेरीचे मतदान पाहण्यासाठी डीस्प्ले बोर्ड लावण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या अधिकृत पासधारकांसह मतमोजणीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाईल. निवडणुकीचा निकाल जाणून घेण्यासाठी किनवट, हदगाव व उमरखेड विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते हिंगोलीत येणार असल्याने नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातून प्रत्येकी १ फौजदार व १० कर्मचारी बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रात मोबाईल, पेजर, घातक शस्त्रे, बॅग, पिशव्या, आक्षेपार्ह वस्तू नेता येणार नाहीत. त्या दृष्टिने प्रवेशद्वारावर घातपात विरोधी तपासणी यंत्रणा लावण्यात आली आहे. उमेदवारांचे निवासस्थान, जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाणी, संवेदनशिल गावांमध्ये विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, निवडणूक निकालानंतर नागरिकांनी शांतता राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी केले आहे. मतमोजणी केंद्र असलेल्या इमारतीत तीन पातळ्यांवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दिली. प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात राहणार आहेत. तळमजल्यावर एसआरपीएफ व जिल्हा पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. इमारतीबाहेर बॅरेकेटिंगजवळही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्या ठिकाणी दोन प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठीही वेगळी व्यवस्था आहे. याशिवाय इमारतीच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. मतमोजणी प्रतिनिधींना त्यांचे केंद्र सोडून दुसर्‍या ठिकाणी जाता येणार नाही. (प्रतिनिधी) सुरक्षेच्या दृष्टिकोणातून जिल्हा पोलिस प्रशासनाने ४६० कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये ४ पोलिस उपअधीक्षक, १३ पोलिस निरीक्षक, फौजदार ते सपोनि दर्जाचे ४२ अधिकारी, ४४० पुरूष कर्मचारी, ३२ महिला कर्मचारी यांच्यासह साध्या वेशातील एक उपअधीक्षक, एक निरीक्षक, ३० पुरूष कर्मचारी, १४ महिला कर्मचारी बंदोबस्तावर राहणार आहेत. १४ टेबलवर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. याकरिता ७०० अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना अधिकृत पासेस देण्यात आल्या असून, सुरक्षा व गोपनीयतेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर केंद्रीय पर्यवेक्षक व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या परवानगीनंतर लाऊडस्पिकरद्वारे आकडेवारी जाहीर केली जाईल. मतमोजणीच्या वेळी राजकीय कार्यकर्ते, मतमोजणी प्रतिनिधी, शांतता राखून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी केले आहे.